Friday , April 26 2024

22 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे दीर्घ आजाराने निधन
लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे दीर्घ आजाराने निधन

चालू घडामोडी (22 जून 2020)

अर्सेनलला ब्रायटनकडून 1-2 अशी हार पत्करावी लागली-इंग्लिश प्रीमियर लीग:

  • करोनानंतर इंग्लिश प्रीमियर लीगला सुरुवात झाल्यानंतर अर्सेनलला अद्याप सूर गवसलेला नाही.
  • गेल्या तीन दिवसांत सलग दुसऱ्या पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले आहे.
  • तर शनिवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात अर्सेनलला ब्रायटनकडून 1-2 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत 10व्या स्थानी घसरण झाली आहे.
  • तसेच प्रशिक्षक मायके ल अर्टेटा यांना खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्येवर उपाय शोधून काढावा लागणार आहे.
  • अन्यथा चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरणे त्यांना कठीण जाणार आहे. बेर्नाड लेनो हा अर्सेनलचा या मोसमातील सर्वोत्तम खेळाडू उजव्या पायाच्या घोटय़ावर पडल्यामुळे त्याला दुखापत झाली.
  • तर निकोलस पेपे याने 68व्या मिनिटाला अर्सेनलचे खाते खोलले, पण त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही.
  • लुइस डंक (75व्या मिनिटाला) आणि नील मॉपे याने अखेरच्या क्षणी गोल करत ब्रायटनला विजय मिळवून दिला. दोन दिवसांपूर्वी अर्सेनलला मँचेस्टर सिटीकडून 0-3 असे पराभूत व्हावे लागले होते.
  • बॉर्नेमाऊथला क्रिस्टल पॅलेस संघाकडून 0-2 अशी हार पत्करावी लागल्यामुळे पुढील वर्षीच्या प्रीमियर लीगमधून त्यांच्यावर बाहेर पडण्याची नामुष्की ओढवणार आहे.
  • लुका मिलिवोजेव्हिक याने 12व्या मिनिटाला 25 यार्डावरून फ्री-किकवर गोल केल्यानंतर 23व्या मिनिटाला जॉर्डन अयेवने गोल करत क्रिस्टल पॅलेसला विजय मिळवून दिला.

देशात करोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला:

  • देशात करोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक रविवारी नोंदविण्यात आला. गेल्या 24 तासांत करोनाचे 15 हजार 413 रुग्ण आढळले.
  • यामुळे आठ दिवसांपूर्वी तीन लाखांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतातील रुग्णसंख्या 4 लाख 10 हजार 469 झाली आहे.
  • उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 50 हजारांहून अधिक आहे.
  • तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 55.49 टक्क्यांवर पोहोचले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 2 लाख 27 हजार 755 झाली असून, गेल्या 24 तासांमध्ये 13 हजार 925 रुग्ण बरे झाले.
  • देशभरात एक लाख 69 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • करोनामुळे आतापर्यंत 13 हजार 254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 306 रुग्ण दगावले.
  • देशातील मृतांचे प्रमाण 3.2 टक्के आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 90 हजार 730 चाचण्या घेण्यात आल्या.
  • आतापर्यंत एकूण 66,7,226 नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

अमेरिकेनंतर ब्राझिल ठरतोय करोनाचा नवा हॉस्पॉट:

  • जगाला लागलेलं करोना व्हायरसचं ग्रहण सुटायचं नाव घेईना. अमेरिकेनंतर आणखी एका देशात करोनाच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे.
  • अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक आहे.
  • ब्राझिलमध्ये करोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही. एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे.
  • तर मागील 24 तासांत ब्राझिलमध्ये 1022 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • तसेच ब्राझिलमध्ये आतापर्यंत 50 हजार 629 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • गेल्या 24 तासांत ब्राझिलमध्ये 34 हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
  • तसेच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार झाली आहे.
  • ब्राझिलच्याआधी सर्वाधिक मृत्यू अमेरिेकेत झाले आहेत. अमेरिकेत एक लाख 22 हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचे दीर्घ आजाराने निधन:

  • रणजी ट्रॉफी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर राजेंद्र गोयल यांचं रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
  • राजेंद्र गोयल 77 वर्षांचे होते. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात त्यांनी सर्वाधिक 637 बळी टिपले.
  • तर इतर कोणत्याही खेळाडूला अद्याप 600 बळींचा टप्पा गाठता आलेला नाही.
  • गोयल यांनी रणजी क्रिकेट गाजवले, पण दुर्दैवाने त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.
  • गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात 25 पेक्षा जास्त बळी टिपण्याचा कारनामा 15 वेळा केला.
  • तसेच  हरयाणाच्या गोयल यांनी 157 सामने खेळले. तर 55 धावांत 8 बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्यांनी 59 वेळा एका डावात 5 बळी तर 18 वेळा एका सामन्यात 10 बळी टिपण्याची किमया साधली.
  • त्यांनी आपल्या रणजी कारकिर्दीत 1,037 धावाही केल्या. ते पतियाळा, पंजाब आणि दिल्ली या संघांकडून क्रिकेट खेळले.

दिनविशेष :

  • 22 जून सन 1757 मध्ये प्लासीची लढाई सुरू झाली.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन 22 जून 1940 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
  • महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण 22 जून 1994 मध्ये जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना 30 टक्‍के आरक्षण.
  • अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून 22 जून 2007 रोजी त्या पृथ्वीवर परत आले.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा