Advertisements
चालू घडामोडी (21 जून 2020)
स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटींची योजना :
- करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे आपआपल्या राज्यांमध्ये परतलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले.
- बिहारच्या खगडिया जिल्ह्य़ातील एका खेडय़ात दूरसंवादाच्या (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी गरीब कल्याण रोजगार योजनेचे उद्घाटन केले.
- तर बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान व ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री या वेळी उपस्थित होते.
- तसेच ही योजना ग्रामीण विकास, पंचायती राज, रस्ते वाहतूक व महामार्ग, खाणी, पेयजल व स्वच्छता, पर्यावरण, रेल्वे, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू, अक्षय ऊर्जा, सीमा रस्ते, दूरसंचार व कृषी अशा वेगवेगळ्या 12 मंत्रालयांच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारणार आहे.
- ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ ही योजना बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिशा या सहा राज्यांच्या 116 जिल्ह्य़ांमधील 25 हजार मजुरांसाठी 125 दिवस राबवली जाईल.
भारतात उपलब्ध झालं करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध :
- करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे.
- तर या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं.
- तसेच ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.
- भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच DCGI या संस्थेकडून या औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. करोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे.
- तर औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे या कंपनीने सांगितले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधाच्या एका गोळीची किंमत 103 रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी 1800 मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर 14 दिवसांपर्यंत 800 मिलिग्रॅमचे दोन डोस रोज घ्यायचे आहेत.
भारतमातेच्या रक्षणासाठी एचएएल सज्ज :
- गलवान खोऱ्यातील वाद शिगेला पोहोचला असताना भारतीय संरक्षण क्षेत्रात लढाऊ विमान बनविण्यात अग्रणी असलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सुद्धा भारताच्या संरक्षणासाठी मैदानात उतरली आहे.
- देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे.
- भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव पाहता युद्धजन्य परिस्थितीत ‘सुखोई 30’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान खरी ताकद सिद्ध करणार आहे.
- तर त्यामुळेच एच.ए.एल.ला देखील अप्रत्यक्षिरत्या हायअलर्टवर आल्याचे सांगितले जात आहे. देशभरात आज जितकी एअरफोर्स केंद्र आहेत तेथे असलेल्या लढाऊ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्याचे धोरण लवकरच अवलंबून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जाणार आहेत.
दिनविशेष :
- 21 जून हा दिवस जगभरात ‘जागतिक योग दिन‘ म्हणून पाळला जातो.
- भारतीय लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म 21 जून 1912 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल झाले होते.
- 21 जून 1949 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात 21 जून 2015 पासून झाली.
Advertisements