Advertisements

चालू घडामोडी (11 मे 2020)
विप्रोच्या दानशूर अझीम प्रेमजींनी पटकावला जगात तिसरा नंबर :
- कोरोना व्हायरसच्या लढाईत रतन टाटा यांच्यानंतर देशाला मदत करणारे विप्रोचे मालक अझीम प्रेमजी यांनी जगात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
- कोरोना व्हायरसच्या मुकाबल्यासाठी जगभरातील 80 अब्जाधिशांनी हात सैल केले आहेत. यात प्रेमजी देखील मागे राहिलेले नाहीत.
- अझीम प्रेमजी यांनी मदतनिधीसाठी खजिनाच ओतला आहे. यामुळे प्रेमजी हे जगातील सर्वाधिक दान देणाऱ्यांमध्ये तिसरे अब्जाधिश ठरले आहेत.
- पहिल्या क्रमांकावर ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी असून दुसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भारताचे या यादीतील एकमेव अब्जाधिश अझीम प्रेमजी आले आहेत.
- तर या तीन व्यक्तींनी जगात सर्वाधिक दान केले आहे. फोर्ब्स मॅक्झिननुसार मार्चनंतर जगातील अब्जाधिशांच्या दान रकमेवर ही यादी बनविण्यात आली आहे.
12 मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार :
- करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- तर त्यानंतर रेल्वे प्रशासनानं 17 मे पर्यंत रेल्वे सेवा सुरू करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
- पंरंतु आता 12 मे पासून मर्यादित रेल्वे मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच संध्याकाळपासून या रेल्वे सेवांचं तिकीट आरक्षित करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.
- 12 मे पासून काही ठराविक मार्गांवर रेल्वेसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली.
- तसेच या मध्ये दिल्ली ते मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, जम्मू तावी, तिरुअनंतरपुरम, मडगाव, दिब्रुगढ, अगरताला, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बंगळुरू, चेन्नई या स्थानकांना जोडणारी रेल्वेसेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 11 मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- 11 मे 1857 चा राष्ट्रीय उठाव – भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली.
- मिनेसोटा अमेरिकेचे 32 वे राज्य 11 मे 1858 मध्ये झाले.
- 11 मे 1867 मध्ये लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले.
- मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना 11 मे 1888 मध्ये रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली.
- इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश 11 मे 1949 मध्ये झाला.
- 11 मे 1949 मध्ये सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलुन थायलंड केले.
Advertisements