Advertisements
चालू घडामोडी (12 मे 2020)
पॅरालिम्पिक अॅथलिट दीपा मलिकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घोषणा :
- पॅरालिम्पिक अॅथलिट दीपा मलिकने सोमवारी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
- भारताच्या पॅरालिम्पिक समितीचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी दीपा मलिकने हा निर्णय घेतल्यचं कळतंय.
- तर पॅरालिम्पिक खेळांमध्ये पहिलं पदक मिळवणारी भारतीय महिला खेळाडू हा बहुमान दीपा मलिकच्या नावावर जमा आहे.
- तसेच 2016 साली रिओमध्ये झालेल्या शॉटपुट प्रकारात दीपाने रौप्यपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त IPC ओशिनीया-आशियाई अजिंक्यपद यासह अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये दीपाने पदकांची कमाई केली होती.
- राष्ट्रीय क्रीडा संहीतेनुसार कोणत्याही भारतीय खेळाडूला संघटनेत काम करायचं असेल तर त्याला आधी निवृत्ती स्विकारावी लागते. या नियमाचं पालन करतानाच दीपाने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
‘कोविड19 अँटिबॉडी’चा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्ट किट तयार :
- करोना व्हायरसविरोधातील लढ्यामध्ये भारताने अजून एक यश मिळवले आहे. भारताने कोविड19 अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी चाचणी किट तयार केली आहे.
- पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (NIV) पहिली स्वदेशी करोना अँटीबॉडी टेस्टिंग किट तयार केली आहे.
- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.”पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने कोविड19 अँटिबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी टेस्टिंग किट तयार केली आहे.
- तर जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात करोना व्हायरस संसर्गावर पाळत ठेवण्यात आणि कोरोना संक्रमितांची ओळख पटवण्यास ही किट महत्वपूर्ण भूमिका निभावेल”, असे ते म्हणाले.
- तर अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
बांधकाम मजुरांना मिळणार पाच हजार रुपयांची मदत :

- दिल्लीतील नोंदणी केलेल्या बांधकाम करणाऱ्या मजुरांना पाच हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असे दिल्लीचे कामगार मंत्री गोपाळ राय यांनी सोमवारी सांगितले.
- दिल्ली सरकारने गेल्या महिन्यात बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला होता. या महिन्यात सरकारने त्यांची मदत करण्यासाठी पुन्हा पाच हजार रुपये जमा करण्यात निर्णय घेतला आहे.
- तर कामगार मंत्री गोपाळ राय यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- मंडळाचे जवळपास 40,000 बांधकाम कामगार नोंदणीकृत आहेत. या बैठकीत बांधकाम पोर्टल सुरू करण्याचे ठरविले आहे. या पोर्टलवर बांधकाम कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात.
- नवीन कामगारांच्या नूतनीकरण व नोंदणीसाठी 15 मेपासून ऑनलाईन नोंदणी देखील सुरू होईल, अशी माहिती गोपाळ राय यांनी दिली.
चंद्राचा तुकडा विक्रीला :
- ब्रिटनच्या लंडन शहरामध्ये एक चंद्राचा तुकडा विक्रीला ठेवण्यात आला आहे. या तुकड्याचे वजन 13.5 किलो आहे.
- तर या तुकड्याची सुरुवातीची किंमत दोन दशलक्ष पाऊंड म्हणजेच 19 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. लंडनच्या लिलाव करणारी क्रिस्टीने हा लिलाव ठेवला आहे.
- चंद्राचा हा तुकडा एका लघू ग्रह किंवा धुमकेतूला आदळल्याने तुटला असावा. यानंतर हा तुकडा सहाराच्या वाळवंटात पडला.
- तसेच या तुकड्याला एनडब्ल्यूए-12691 हे नाव देण्यात आले आहे. हा पृथ्वीवर मिळालेला चंद्राचा पाचवा सर्वांत मोठा तुकडा आहे.
- अधिकृतरित्या पृथ्वीवर चंद्राचे 650 किलोचे तुकडे आहेत. यामध्ये हा देखील आहे. या तुकड्याचा आकार फुटबॉल एवढा आहे.
सानिया मिर्झा ठरली Fed Cup Heart पुरस्काराची मानकरी :
- भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने प्रतिष्ठेचा Fed Cup Heart पुरस्कार पटकावला आहे.
- तर हा पुरस्कार जिंकणारी सानिया पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
- Asia/Oceania गटात सानिया मिर्झाने 10 हजारापेक्षा जास्त मत घेत या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे.
- चाहत्यांनी केलेल्या ऑनलाईन व्होटिंगद्वारे सानिया मिर्झाला हा पुरस्कार मिळाला आहे.
- तसेच एकूण मतांपैकी 60 टक्के मत सानिया मिर्झाला पडली आहेत.
- Fed Cup Heart पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 2 हजार अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस मिळतं. सानिया मिर्झाने आपल्याला मिळालेली बक्षीसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचं जाहीर केलं आहे.
दिनविशेष :
- 12 मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
- पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात 12 मे 1364 मध्ये झाली.
- अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात 12 मे 1551 मध्ये झाली.
- आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट 12 मे 1666 मध्ये झाली.
- 12 मे 1797 मध्ये नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
- बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 12 मे 1941 मध्ये सादर केले.
- प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन 12 मे 1952 मध्ये सुरू झाले.
- 12 मे 1955 मध्ये दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
- सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना 5 12 मे 1965 मध्ये चंद्रावर कोसळले.
Advertisements