Thursday , April 25 2024

9 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:
‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:

चालू घडामोडी (9 जुलै 2020)

भारतीय जवानांना 89 अ‍ॅप्स काढून टाका असा आदेश:

  • भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून 89 अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
  • भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे.
  • भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे.
  • 15 जुलैपर्यंत अ‍ॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.

कोरोन आजाराची नवीन लाट- मेंदूशी संबंधित:

  • जगभरात थैमान घेतलेल्या कोविड-१९ आजारावर विविध देशांमध्ये सध्या संशोधनं सुरु आहेत.
  • एका परदेशी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी या आजाराबाबत नवा इशारा दिला आहे. करोनासंबंधित मेंदूच्या आजारांची नवी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
  • युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथील एका संशोधनानुसार, करोनाची लागण झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांपैकी 43 रुग्णांच्या मेंदूचे कार्य बिघडलेले आढळून आले.
  • त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्ट्रोक, मेंदूच्या नसा खराब होणे आणि मेंदूशी संबंधित इतर विपरित परिणाम झालेले आढळून आले आहेत.

‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:

  • ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावी, यासाठी प्रत्येक राज्याने एका खेळाची निवड करून त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
  • एका वेबिनारदरम्यान रिजिजू यांनी ‘एक राज्य, एक खेळ’ या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला.
  • ‘भारताच्या प्रत्येक राज्यातील क्रीडा मंत्र्यालयांना ‘एक राज्य, एक खेळ’ या मोहिमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
  • मणिपूर हे राज्य बॉक्सिंग या खेळावर विशेष लक्ष देऊ शकते,’’ असे रिजिजू म्हणाले.

दिनविशेष :

  • शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता.
  • सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला.
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता.
  • सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
  • सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा