Advertisements

चालू घडामोडी (7 जुलै 2020)
सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे:
- करोना संसर्गामुळे ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त ऑनलाइन होत आहे अशा सर्व परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द करण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
- इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणीकडून यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे.
- अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाने ऑनलाइन शिक्षणास सुरुवात केली असेल तर त्या विद्यार्थ्यांना देश सोडावा लागणार आहे अन्यथा त्यांना हद्दपार केलं जाईल असं आदेशात सागंण्यात आलं आहे.
- होमलँड सेक्युरिटी विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला 11 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांकडे विद्यार्थी व्हिसा आहे.
देशातील 12 टक्के स्टार्टअपला टाळे तर 70 टक्के स्टार्टअपची स्थिती गंभीर:
- देशातील 12 टक्के स्टार्टअप बंद पडले असून, तब्बल 70 टक्के स्टार्टअपची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या गंभीर झाली आहे.
- इंडस्ट्री चेंबर फिक्की व इंडियन एंजेल नेटवर्क यांनी ‘भारतीय स्टार्टअपवर झालेला करोनाचा प्रभाव’ या विषयावर एक पाहणी केली.
- या पाहणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार 33 टक्के स्टार्टअपने आपली गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
- तर 10 टक्के स्टार्टअपचे करार संपुष्टात आले आहेत. केवळ 22 टक्के स्टार्टअपकडेच पुढील तीन ते सहा महिने निर्धारित खर्चासाठी निधी उपलब्ध आहे. तर 68 टक्के स्टार्टअपनं खर्चाला कात्री लावण्यास सुरूवात केली आहे.
अमित पांघल याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघात अव्वल स्थान प्राप्त केले:
- आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच जागतिक रौप्यपदक विजेता भारताचा बॉक्सर अमित पांघल याने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीमध्ये पुरुषांच्या 52 किलो वजनी गटात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
- ‘एआयबीए’ने तब्बल 18 महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच क्रमवारी जाहीर केली.
चार लाख 24 हजार 433 जणांनी करोनावर मात केली:
- भारतामधील करोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 60 टक्केंपेक्षा जास्त आहे.
- आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात जवळपास सात लाख जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
- यापैकी चार लाख 24 हजार 433 जणांनी करोनावर मात केली आहे.
दिनविशेष :
- 7 जुलै हा दिवस ‘जागतिक चॉकलेट दिन‘ आहे.
- कावसजीदावर यांनी दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये सन 1854 मध्ये सुरू केली.
- सन 1910 मध्ये पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली.
- भारतीय क्रिकेटपटू माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये झाला.
Advertisements