Friday , April 26 2024

22 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

960 कर्मचाऱ्यांची कपात करणार LinkedIn:
960 कर्मचाऱ्यांची कपात करणार LinkedIn:

चालू घडामोडी (22 जुलै 2020)

960 कर्मचाऱ्यांची कपात करणार LinkedIn:

  • करोना संकटकाळात मोठ्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांची कपात सुरूच आहे. मंगळवारी आघाडीची प्रोफेशनल सोशल नेटवर्किंग वेबसाइट LinkedIn ने 900 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्याचा निर्णय घेतला.
  • जगभरातील अनेक कंपन्या LinkedIn चा वापर योग्य उमेदवाराचा शोध घेण्यासाठी करतात, तर उमेदवार/कर्मचारी या प्लॅटफॉर्मचा वापर नवीन नोकरी शोधण्यासाठी करत असतात.
  • कंपनीने जगभरातील आपल्या 960 म्हणजे कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्येच्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचं मंगळवारी जाहीर केलं.
  • सेल्स आणि हायरिंग ( sales and hiring ) डिव्हिजनधील कर्मचाऱ्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  • LinkedIn चे मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान रॉसलान्सकी (Ryan Roslansky) यांनी, नोकरीवरुन कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 10 आठवड्यांचा पगार दिला जाईल, असं सांगितलं. याशिवाय, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना 2020 अखेरपर्यंत आरोग्य विमाची सुविधा मिळेल असेही त्यांनी नमूद केले.

सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला:

  • ऑक्सफर्डने करोना व्हायरस विरोधात विकसित केलेली लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरल्यामुळे जगभरात सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.
  • भारताची सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही संस्था या प्रकल्पात भागीदार आहे. त्यामुळे सर्व काही नियोजनानुसार झाले, तर भारतीयांनाही ही लस नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते.
  • सिरमने या प्रकल्पात 20 कोटी डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यासाठी त्यांना फक्त 30 मिनिट लागली.
    सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी एनडीटीव्हीला ही माहिती दिली.

750 अब्ज युरोंची रक्कम अनुदान- युरोपियन:

  • युरोपियन महासंघची मंगळवारी संपलेली बैठक ही आतापर्यंतची सर्वात मोठी बैठक असल्याचं म्हटलं जात आहे.
  • या बैठकीदरम्यान तब्बल 1 हजार 800 अब्ज युरोंच्या मदत निधीसाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
  • पुढील सात वर्षांसाठी युरोपियन महासंघाच्या देशांच्या मदतीसाठी हे पॅकेज तयार करण्यात आलं आहे. यापैकी 750 अब्ज युरोंची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या रूपात देण्यात येणार आहे.
  • “आम्ही करून दाखवलं. युरोप एकत्र आहे आणि ही एक चांगली डील आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही सद्यस्थितीकडे पाहता युरोपसाठी उत्तम डील आहे,” असं मत युरोपिय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी सांगितलं.

भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार:

  • भारतीय नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रातील दबदबा आणखी वाढणार आहे. कारण भारताच्या ताफ्यात P-8I या बहुउपयोगी विमानांचा समावेश होणार आहे.
  • अमेरिकन बनावटीची आणखी चार विशेष विमाने पुढच्यावर्षीपर्यंत नौदलाला मिळणार आहेत.
  • P-8I या विमानांमध्ये लांब अंतरावरुन शत्रुच्या पाणबुडीचा अचूक वेध घेण्याची, टेहळणीची आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगची क्षमता आहे.
  • बोईंगकडून अशी आणखी सहा विमाने घेण्याचा भारताकडे पर्याय आहे. यासंबंधी 2021 वाटाघाटी सुरु होऊ शकतात.
  • भारतीय नौदलाकडे P-8A पोसी़डॉन विमान असून P-8I मधला I खास भारतासाठी आहे. समुद्री गस्त घालण्याबरोबरच पाणबुडीवर अचूक प्रहार करण्यासाठी सुद्धा हे विमान सक्षम आहे.
  • हारपून ब्लॉक 2 मिसाइल आणि हलक्या टॉरपीडोस सुद्धा या विमानामध्ये आहेत. पाणबुडी बरोबर जहाजविरोधी क्षेपणास्त्र सुद्धा या विमानावरुन डागता येऊ शकते.

तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची Work From Home 31 डिसेंबरपर्यंत:

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा सरकारने मंगळवारी रात्री केली.
  • या घोषणेनुसार आता माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी आणि बीपीओ कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत घरुनच काम करता येणार आहे.
  • वर्क फ्रॉम होमची मर्यादा 31 जुलै रोजी संपत होती. मात्र त्याआधीच ही मुदत पाच महिन्यांनी वाढवली आहे. यासंदर्भातील माहिती दूरसंचार विभागाने मंगळवारी रात्री ट्विटवरुन दिली आहे.
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने घरुन काम करण्यासंदर्भातील अटी आणि नियमांमध्ये 31 डिसेंबर 2020 पर्यंत शिथिल करण्यात आल्या आहेत,” असे ट्विट दूरसंचार विभागाने केलं आहे.

रोनाल्डोचे विक्रमी अर्धशतक- सेरी-ए फुटबॉल स्पर्धा :

  • अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन मिनिटांच्या अंतरात दोन गोल केल्याने युव्हेंटसने सेरी-ए फुटबॉल स्पर्धेत लॅझियोला 2-1 नमवले.
  • रोनाल्डो सेरी-ए, इंग्लिश प्रीमियर लीग, ला-लिगा या स्पर्धामध्ये 50 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला.
  • या विजयाबरोबरच युव्हेंटसने विक्रमी सलग नवव्या विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
  • रोनाल्डोने 51व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला, तर 54व्या मिनिटाला दुसरा गोल केला.

दिनविशेष :

  • 22 जुलै 1908 मध्ये देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती.
  • पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची 22 जुलै 1944 मध्ये सुरुवात झाली.
  • 22 जुलै 1898 मध्ये शास्त्रीय गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचा जन्म झाला.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा