Advertisements

चालू घडामोडी (15 जून 2020)
रशियाच्या विजयी परेडमध्ये पहिल्यांदाच भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग:
- पहिल्यांदाच भारतानं आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांना रशियातील मॉस्कोमध्ये पार पडणाऱ्या वर्षिक परेडमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
- आतापर्यंत या परडेमध्ये केवळ लष्कराचा सहभाग होता. परंतु 24 जून रोजी पार पडणाऱ्या या परेडमध्ये लष्कर, हवाईदल आणि नौदलही सहभागी होणार आहे. रशियानं या परेडसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिलं होतं.
- भारतीय सैन्याची तिन्ही दलांकडून आपल्या ताकदीचं प्रदर्शन केलं जाणार आहे.
- 1945 मध्ये नाझी जर्मनीच्या शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
- 1945 मध्ये नाझी जर्मनीच्या शरणागती पत्करल्यानंतर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
- गेल्यावर्षी व्लादिवोस्तोकमध्ये झालेल्या भेटीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी दिवसाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं.
- आता भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे 75 ते 80 जवान 19 जून रोजी या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे.
- यावर्षी रशियाच्या विजयी दिवसाचं 75 वं वर्ष असल्यानं रशियानं अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिलं होतं.
कालापानी, लिपुलेखमधील जमीन भारतीय ग्रामस्थांच्या नावावर:
- उत्तराखंडमधील कालापानी व लिपुलेख हे भाग नेपाळने त्यांच्या नकाशात दाखवले असले तरी जमिनीच्या नोंदीनुसार तो भारताचा भाग आहे असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
- स्थानिक नोंदीनुसार कालापानी व लिपुलेख हे दोन्ही भाग जेथे आहेत ती जमीन भारतातील दोन खेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे.
- लिपुलेख, कालापानी, नाभीधांग या भारत-नेपाळ सीमेवरील भागातील जमीन गरबियांग व गुंजी या धारचुला विभागातील खेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या मालकीची आहे.
- हा भाग पिठोरगड जिल्ह्य़ात येतो, असे धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी ए. के. शुक्ला यांनी सांगितले.
- कैलाश मानसरोवर यात्रा दरवर्षी भारत-चीन सीमेवर लिपुलेख मार्गे जात असते. गारबीयांगच्या ग्रामस्थांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी कालापानी येथे 1962 च्या चीन युद्धापूर्वी शेती सुरू केली होती.
- कृष्णा गाब्रियाल यांनी सांगितले की, 1962 पूर्वी तेथे कडधान्ये पिकवली जात होती.
- काली नदी ही नेपाळ व भारत यांच्या सीमेवर आहे.
Jio ला मिळाली एकूण 1.04 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक:
- रिलायन्स ग्रुपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा ओघ सुरूच असून आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) जिओ प्लॅटफॉर्मने 6,441.3 कोटी रुपयांमध्ये 1.32 टक्के हिस्सेदारी ‘टीपीजी’ आणि ‘एल कॅटरटॉन’ या दोन मोठ्या कंपन्यांना विकली आहे.
- यासोबतच जिओ प्लॅटफॉर्म्सला गेल्या आठ आठवड्यांमध्ये 10 गुंतवणूकदारांकडून तब्बल 1,04,326.9 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे
- सर्वात आधी फेसबुकने 22 एप्रिल रोजी जिओमध्ये 10 टक्के हिस्सेदारी घेतली होती.
- रिलायन्स इंडस्ट्रीजने 0.93 टक्के हिस्सेदारी अमेरिकेच्या टीपीजी या कंपनीला 4,546.80 कोटी रुपयांमध्ये आणि जगातल्या मोठ्या खासगी इक्विटी कंपन्यांपैकी एक असलेल्या L Catterton कंपनीला 1,894.50 कोटी रुपयांमध्ये 0.39 टक्के हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली.
- 1989 मध्ये स्थापना झालेली एल कॅटरटॉन ही एक खासगी इक्विटी फर्म आहे.
- 1992 मध्ये सुरू झालेली टीपीजी ही एक ग्लोबल अल्टरनेटिव अॅसेट फर्म आहे. या गुंतवणुकीसोबतच कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म्समधील एकूण 22.3 हिस्सेदारी विकली आहे.
- सर्वप्रथम फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं 43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 9.99 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.
अभिनेते रतन चोप्रा यांचं निधन:
- बॉलिवूड अभिनेता रतन चोप्रा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कर्करोगाना त्रस्त होते.
- अखेर पंजाबमधील मलेर कोटला येथे राहत्या घरी त्यांचं निधन झालं. ‘मोम की गुडियाँ’ या चित्रपटामधून ते घराघरात पोहोचले होते.
- रतन चोप्रा यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिली. आर्थिक चणचण असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार करता न आल्याचं सांगण्यात येत आहे.
- रतन चोप्रा यांनी लग्न केलं नव्हतं. मात्र त्यांनी अनिता या मुलीला दत्तक घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्या पश्चात केवळ अनिताच आहे.
- रतन चोप्रा यांनी 1972 मध्ये ‘मोम की गुडियाँ’ या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्याकडे अनेक चित्रपटांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे ते त्याकाळी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता होते.
बार्सिलोनाचे दमदार पुनरागमन- ला लिगा फुटबॉल :
- तीन महिन्यांनंतर स्पेनमधील ला-लिगा फुटबॉलला सुरुवात झाल्यानंतर अव्वल खेळाडू लिओनेल मेसीच्या गोलसह बार्सिलोना संघाने दमदार पुनरागमन केले आहे.
- बार्सिलोनाने तीन महिन्यांनंतर पहिली लढत खेळताना मॅर्लोकावर 4-0 सहज मात केली.
- गेल्या आठवडय़ात पायाच्या दुखापतीमुळे मेसीच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली होती.
- मात्र त्यातून दमदार पुनरागमन करत मेसीने मॅर्लोकाविरुद्ध गोल तर केलाच, पण बार्सिलोनासाठी आणखी दोन गोल व्हायला मदत केली.
12 मोठ्या सामंजस्य करारांवर मुख्यमंत्र्यांचं स्वाक्षऱ्या:
- महाराष्ट्रातील अर्थचक्र गती देण्यासाठी 12 मोठ्या सामंजस्य करारांवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षºया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- या करारांमुळे आपला मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 ची सुरुवात होईल.
- त्यात प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर, 40,000 एकराहून अधिक क्षेत्रफळाची लँडबँक, लवचिक भाड्याने आणि किंमतीची रचना, महापरवाना च्या माध्यमातून 48 तासात स्वयंचलित परवानग्या, विशेष कामगार संरक्षण मार्गदर्शन व स्थानिक कौशल्य यासाठी कामगार ब्युरो यासारखे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.
- या सामंजस्य कराराद्वारे अमेरिका , चीन , दक्षिण कोरिया, सिंगापूर व भारतातील मोठ्या उद्योगांनी गुंतवणूक करण्यास सहमती दिली असून ते अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया व इतर क्षेत्रात गुंतवणूक करणार आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगारदेखील उपलब्ध होईल, असा दावाही सूत्रांनी केला.
इबोला रेमडिसिव्हिरची 127 देशांमध्ये विक्री- हे औषध कोरोना साथीवरही रामबाण ठरण्याची शक्यता:
- इबोला आजारावर बनविण्यात आलेले रेमडिसिव्हिर हे औषध कोरोना साथीवरही रामबाण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- त्यामुळे भावी काळात रेमडिसिव्हिरची 127 देशांमध्ये विक्री करण्यासाठी गिलिड सायन्सेस या उत्पादक कंपनीसोबत डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीने करार केला आहे.
- डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज रेमडिसिव्हिरचे उत्पादन करून विविध देशांत त्याची विक्री करू शकते.
- या औषधाच्या उत्पादनासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान साहाय्य गिलिड सायन्सेस कंपनीकडून डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला मिळणार आहे.
- कोरोना रुग्णांना तातडीच्या उपचारांमध्ये रेमडिसिव्हिर औषधाचा वापर करण्याची परवानगी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (यूएसएफडीए) गिलिड सायन्सेस कंपनीला दिली होती.
- रेमडिसिव्हिरचे उत्पादन करून या औषधाची अमेरिका व युरोप वगळून अन्य 127 देशांमध्ये विक्री करण्यासाठी भारतातील सिप्ला, ज्युबिलियंट लाईफसायन्सेस या कंपन्यांनी याआधीच गिलिड सायन्सेस या कंपनीशी करार केला आहे.
- त्या मालिकेत आता डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनीचा समावेश झाला आहे.
दिनविशेष :
- 15 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय हवा दिन‘ आहे.
- वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जॉं बाप्तिस्ते डेनिस यांनी 15 जून 1667 मध्ये यशस्वी रक्तसंक्रमण केले.
- 15 जून 1869 मध्ये महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
- लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे ‘समाजसेवक अण्णा हजारे‘ यांचा जन्म 15 जून 1937 रोजी झाला.
- बा.पां. आपटे हे 15 जून 1970 रोजी पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
Advertisements