11 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

Advertisements
तिरुमला तिरुपती देवस्थान
तिरुमला तिरुपती देवस्थान

चालू घडामोडी (11 जून 2020)

पहिल्याच दिवशी तिजोरीत ‘इतकं’ दान- तिरुपती मंदिर:

  • लॉकडाउननंतर सोमवारी(दि.8) पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आलं. मंदिर सोमवारपासून तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आलं होतं.
  • 11 जूनला म्हणजे आजपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात येणार आहे.
  • भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान करोना व्हायरसच्या संकटामुळे 20 मार्चपासून बंद होते. सोमवारी हे मंदिर पहिल्यांदा उघडले आणि पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल 25 लाख 70 हजार रुपये दान केले.
  • पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी मंदिर स्थानिकांसाठी उघडण्यात आले होते.
  • पहिले दोन दिवस मंदिरात जवळपास 12 हजार भक्तांनी दर्शन घेतले. ते सर्व टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकं होते.

संजिता चानूवरील आरोप अखेर मागे घेतले:

  • भारताची वेटलिफ्टर के. संजिता चानूवरील उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी करण्यात आलेले आरोप अखेर आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) मागे घेतले आहेत.
  • चानूचे जे चाचणीचे नमुने घेण्यात आले होते, त्यात विसंगती आढळल्याने जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेकडून (वाडा) चानूवरील आरोप मागे घेण्यास ‘आयडब्ल्यूएफ’ला सांगण्यात आले.
  • ‘‘उत्तेजक सेवन प्रकरणाच्या आरोपातून अधिकृतरीत्या माझी सुटका झाली आहे याचा आनंद आहे. मात्र त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेला पात्र ठरण्यासाठी असलेल्या स्पर्धाना मी मुकले.
  • या आरोपांच्या निमित्ताने मला जो मानसिक त्रास झाला आहे त्याची जबाबदारी कोण घेणार,’’ असे मणिपूरच्या चानूने म्हटले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक वामनराव तेलंग यांचे निधन:

  • ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक वामनराव तेलंग यांचे निधन. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
  • उपचारादरम्यान हृदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्यांचे निधन झाले. वामनराव तेलंग हे दै. तरुण भारतचे माजी संपादक आणि विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष होते.
  • 22 मार्च रोजी वामनराव तेलंग यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच एक गौरविकाही निघणार होती. परंतु, देशात वाढलेल्या कोरोना विषाणुमुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला होता.

दऱ्याखोऱ्यांत, घनदाट जंगलात महावितरणचे काम:

  • निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने जावळी खोऱ्यातील घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्यासाठी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चार दिवस यशस्वी झुंज देत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह अतिदुर्गम 16 गावे (ता. महाबळेश्वर) प्रकाशमान केली आहेत.
  • महाबळेश्वर येथील महावितरणच्या वेण्णालेक उपकेंद्रातून प्रतापगड उच्चदाब 22 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीद्वारे सह्याद्री डोंगररांगेत असलेल्या अतिदुर्गम जावळी खोऱ्यातील प्रतापगड, मेटतळे, वाडा कुंभरोशी, शिरवली, कासरूड, हतलोट, बिरवाडी, डिरमणी, जावळी, दुधोशी, फरोशी, पारसोंड, प्रतापगड आदी 16 गावांतील सुमारे 1250 वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.
  • तीन जूनला आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने विविध ठिकाणी मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने या उच्चदाब वीजवाहिनीचे आठ वीजखांब तसेच अडीच किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या.
  • बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी चक्रीवादळानंतर सातारा जिल्ह्यातील वीजयंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी तसेच प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
  • कंत्राटदारांचे 15 कर्मचारी व सुमारे 40 ग्रामस्थ यांनी सलग चार दिवस वीजयंत्रणा उभारण्याचे काम केले.

अन्यथा पुनश्च लॉकडाऊन इशारा – मुख्यमंत्र्यांचा :

  • महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्याचे काम सुरू झाले आहे. सर्व व्यवहार पुन्हा नव्याने सुरू करण्याची ही संधी आहे. मात्र, जनतेने संयम दाखवला नाही आणि निष्कारण गर्दी करणे सुरू केले.
  • तर नाइलाजाने यापेक्षा कठोर लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
  • सुरक्षित अंतर ठेवून अतिशय सावधपणे काम करावे लागणार आहे.
  • सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मोकळ्या मैदानांमध्ये वावरण्यास मुभा दिली आहे.
  • जर लोकांनी विनाकारण गर्दी केली आणि त्यातून बाधा वाढत गेली, तर लॉकडाऊन कठोर करावे लागेल. मात्र, महाराष्ट्रातील जनतेवर आपला विश्वास असून, तशी वेळ येणार नाही, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दिनविशेष :

  • मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.
  • 11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
  • एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Join WhatsApp Group