Friday , April 26 2024

चालू घडामोडी : २८ जानेवारी २०२१ | Mission MPSC

AdvertisementsCurrent Affairs : 28 January 2021या वर्षी भारताचा जीडीपी ११.५ टक्के; आयएमएफचा अंदाजआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 11.5 टक्के होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.विशेष म्हणजेच हा विकासदर चीन आणि इतर मोठ्या देशांच्या अंदाजित विकासदराहून अधिक आहे.आयएमएफने जारी केलेल्या वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक म्हणजेच जागतिक आर्थिक विकासाचा आढावा घेणाऱ्या अहवालामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.सन 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये करोना लॉकडाउनमुळे बसलेल्या फटक्‍यामुळे विक्रमी घसरण झाली होती.चिनी अर्थव्यवस्था 8.1 टक्‍क्‍यांनी आर्थिक विकास करेल तर दुसरीकडे स्पेन 5.9 आणि फ्रान्सचा आर्थिक विकासदर 5.5 टक्के इतका असेल अशा अंदाज आयएमएफने व्यक्त केला आहे.भारत हा वेगाने विकास करत असणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे.मागील तिहामीमध्ये काही देशांना करोना लस बनवण्यात यश मिळाले असून इतर काही देशांनाही करोना लसीकरणाला प्रारंभ केला आहे. आयएमएफने 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 5.5 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑक्‍टोबर आयएमएफने हाच विकास दर 5.2 टक्के असेल असं म्हटले होते.फ्रान्सकडून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलंफ्रान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच भारतात दाखल झाली.नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं.फ्रान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली.भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत.यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत.पंत, अश्विनसह भारताच्या चौघांना नामांकनेभारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि थंगरासू नटराजन या वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकन लाभले आहे.यंदाच्या वर्षांपासून ‘आयसीसी’ प्रथमच हा पुरस्कार प्रदान करणार असून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन, इंग्लंडचा कर्णधार जो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स, अफगाणिस्तानचा रहमनुल्ला गुरबाज यांनाही जानेवारीतील पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले असून महिलांमध्ये पाकिस्तानची निदा डार, दक्षिण आफ्रिकेची मॅरिअन कॅप व नडिन डी क्लर्क यांची शिफारस केली आहे.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा