Saturday , April 20 2024

चालू घडामोडी : ०६ फेब्रुवारी २०२१ | Mission MPSC

AdvertisementsCurrent Affairs : 06 February 2021विज्ञानदिनी इस्रोकडून स्टार्टअप कंपनीचा उपग्रह अवकाशातयंदाच्या वर्षांतील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो विज्ञान दिनी २८ फेब्रुवारीला ब्राझीलचा अ‍ॅमॅझोनिया १ व भारताचे तीन उपग्रह सोडणार आहे.त्यातील एक उपग्रह हा भारतीय स्टार्टअप कंपनीचा आहे.ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक सी ५१ च्या मदतीने चेन्नईपासून १०० कि.मी अंतरावर असलेल्या प्रक्षेपण तळावरून हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत.अ‍ॅमेझोनिया हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो ब्राझीलने तयार केलेला आहे.आनंद व सतीश धवन तसेच युनिटीसॅट हे उपग्रह समवेत सोडले जाणार आहेत.आनंद हा उपग्रह पिक्सेल या स्टार्टअप म्हणजे नवोद्योगाचा असून सतीश धवन उपग्रह चेन्नईच्या स्पेस किड्झ इंडिया या संस्थेचा आहे.युनिटीसॅट उपग्रहात तीन उपग्रहांचे मिश्रण असून त्याची रचना जेपीयार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, श्रीपेरूम्पदूर, जी.एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग नागपूर, श्री शक्ती इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कोईमतूर यांनी केली आहे.भारत-अमेरिका संयुक्त युद्ध सराव ८ पासून सुरूभारतीय आणि अमेरिकी लष्कराचा संयुक्त सराव ८ ते २१ फेब्रुवारीपर्यंत राजस्थानच्या बिकानेरमधील महाजन फील्डमध्ये होईल.दहशतवाद प्रतिबंधावर केंद्रित या सरावात दोन्ही लष्करांचे प्रत्येकी २५० सैनिक सहभागी होतील.जगातील पहिली फ्लाइंग रेसिंग कारऑस्ट्रेलियाच्या अलॉडा एअरोनॉटिक्सने एअरस्पीडर एमके-३ ही जगातील पहिली फ्लाइंग रेसिंग कार सादर केली आहे.या कारमध्ये ८ प्रॉपेलर लावले आहेत, ती हेलिकॉप्टरप्रमाणेच उड्डाण घेऊन वेगाने पुढे जाते.तिचा सर्वाधिक वेग १२० किमी आहे.इनोव्हेशन इंडेक्स २०२१ : द. कोरिया जर्मनीला पिछाडीवर टाकून पहिल्या क्रमांकावरजगभरात नव्या शोधाच्या क्षेत्रात दक्षिण कोरिया यंदा अग्रस्थानी आहे.अमेरिका आघाडीच्या १० देशांच्या यादीतून बाहेर आहे.ब्लूमबर्गने आपला इंडेक्स २०२१ जाहीर केला आहे. यादीत भारताचा क्रमांक ५० वा आहे. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने चार अंकांनी प्रगती केली आहे.गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या जर्मनीला कोरियाने मागे टाकले. जर्मनीचा क्रमांक आता चौथा आहे. नऊ वर्षांपासून ही क्रमवारी जाहीर केली जाते. त्यात ७ वेळा आशियाई देशांनी आघाडी घेतली आहे.यात क्रमाक्रमाने वर येत सिंगापूर व स्वित्झर्लंड क्रमश: दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ब्लूमबर्ग इंडेक्स दहाहून जास्त मापदंडांचे विश्लेषण करते. त्यात संशोधन, विकासावरील खर्च, उत्पादनातील क्षमता, हायटेक पब्लिक कंपन्यांना प्रोत्साहन देणे व इतर निकषांवर ही क्रमवारी दिली जाते.इनोव्हेशन रँकसिंगापूरइस्रायलऑस्ट्रियास्वित्झर्लंडजर्मनीनेदरलँडडेन्मार्कस्वीडनफिनलँडद. कोरिया

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा