Advertisements

चालू घडामोडी (6 जून 2020)
UPSC परीक्षेची नवीन तारीख जाहीर :
- करोना प्रसाराच्या धोक्यामुळे गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- तर गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेची तारीख करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आयोगानं परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.
- आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात आज बैठक झाली. या बैठकीत पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली.
- केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 31 मे 2019 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, लॉकडाउनमुळे ती पुढे ढकलण्यात आली.
- तसेच त्यानंतर 2 जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचं आयोगानं जाहीर केलं होतं. पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यानं आयोगानं अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली.
- केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. 4 ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 रोजी घेण्यात येणार आहे.
नव्या सरकारी योजनांबाबत मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय :
- नव्या सरकारी योजनांबाबत मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मोदी सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत एकही नवी सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- मात्र हा निर्णय पंतप्रधान गरीब कल्याण योजना आणि स्वावलंबी भारत यांच्याशी संबंधित असलेल्या योजनांना लागू होणार नाही असंही सरकारने म्हटलं आहे.
- सरकारने नवीन सरकारी योजना लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे असं अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवदेनात म्हटलं आहे.
- करोनामुळे सुरु असलेल्या आर्थिक संकटात भारत सरकारने कॉस्ट कटिंग उपाय अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
- तसेच आत्मनिर्भर भारत आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना यांसाठी करण्यात येणारा खर्च सुरु राहिल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
- आर्थिक वर्ष 20-21 च्या क्रमवारीत मंजूर झालेल्या किंवा मूल्यांक केलेल्या सर्व योजनांना हा नियम लागू होणार आहे.
Jio चा सहा आठवड्यांमध्ये सहावा करार :
- लॉकडाउनदरम्यान रिलायन्स ग्रुपमध्ये अजून एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार आहे.
- तर अबू धाबीची ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ (Mubadala Investment Company)जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL)दिली आहे.
- तसेच अबू धाबीमधील मोठी गुंतवणूक करणारी कंपनी म्हणून ‘मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी’ ओळखली जाते.
- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणुकीद्वारे कंपनी जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल.
- यासोबतच गेल्या सहा आठवड्यांमधला हा जिओचा सहावा मोठा करार ठरेल. या गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये कंपनीत जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 87,655 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याची माहितीही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने दिली.
- तर यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मुबादलाव्यतिरिक्त फेसबुक, सिल्वर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.
एसटीच्या कर्मचारी व औद्योगिक उपमहाव्यवस्थापकपदी शैलेश चव्हाण यांची नियुक्ती :
- एसटीच्या कर्मचारी व औद्योगिक महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या पदाची परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुदतवाढ नाकारली असून, एसटीतील उपमहाव्यवस्थापकपदी शैलेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महाव्यवस्थापक सध्या पद रिक्त ठेवण्यात आले आहे.
- तर तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात माधव काळे 2016 मध्ये कर्मचारी व औद्योगिक संस्था पदासाठी एसटीमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आली होती.
- तसेच त्यानंतर 2018 मध्ये नियोजन व पणन या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार काळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
- 31 मे 2019 रोजी राज्य शासनातून सेवा निवृत्त झाले. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने कार्यभार एसटी महांडळातील कर्मचारी व औद्योगिक संबंध या पदाचा पदभार सांभाळत नियोजन व पणन या पदाचा कारभार सांभाळला, त्यानंतर, आता 31 मे 2020 रोजी कंत्राटी पदाच्या नेमणुकीचा कालावधी संपल्यानंतरही मुदवाढीसाठी काळे यांचे प्रयत्न सुरू होती.
अक्षय कुमारचा कोट्याधीश जगातील श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत समावेश :
- बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांच्या यादीमध्ये अक्षय कुमारचे नाव सगळ्यातवर येते. 2019 मध्ये त्याने तब्बल चार हिट सिनेमा दिले आहेत. ज्यापैकी तीन सिनेमांनी 200 कोटींच्यावर कमाई केली आहे.
- तर 2020मध्ये अक्षय कुमार एकमेव असा भारतीय आहे ज्याने फोर्ब्सच्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीत स्थान मिळवलं आहे. या यादीत अक्षय कुमारचे नाव 52व्या स्थानी आहे.
- 2019 जून ते 2020 मे महिन्यापर्यंत अक्षय कुमारने 48.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 366 कोटींची कमाई केली आहे.
- तसेच 2019मध्ये या यादीत अक्षय 33व्या स्थानावर होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अक्षय 19 अंकांनी मागे गेला आहे.
- तर या यादीत जेनर, कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.
दिनविशेष :
- 6 जून 1674 मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
- गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 6 जून 1930 मध्ये झाली.
- 6 जून 1969 मध्ये वि.स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.
- भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.
Advertisements