29 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

जगभरात 4 लसींवरील संशोधन लक्षवेधक
जगभरात 4 लसींवरील संशोधन लक्षवेधक

चालू घडामोडी (29 मे 2020)

जगभरात 4 लसींवरील संशोधन लक्षवेधक :

  • करोनाविरोधातील लढय़ात लस उपलब्ध होणे हाच प्रभावी उपाय असल्याने जगभर संशोधन केले जात आहे.
  • तर त्यापैकी आठ लसींवरील संशोधन प्रगतीपथावर आहे. त्यातही चार लसींवरील प्रयोग लक्षवेधी असून ते संशोधनाच्या पुढील टप्प्यावर पोहोचलेले आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य आणि करोनासंदर्भातील संशोधन-विकास कृतीगटाचे सहअध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
  • तसेच एका बाजूला लस संशोधनाचे काम सुरू असले तरी करोनावर कोणती औषधे प्रभावी ठरू शकतील यावरही अधिक प्रयोग केले जात आहेत.
  • तर फेव्हिपिराव्हीर, रेमडेसीव्हीर, टोसिलिझूमॅब, कन्व्हेलेसंट प्लाझ्मा, अर्बिडॉल, हायड्रोक्झिक्लोरोक्विन, देशी बनावटीचै औषध ओसीक्यूएच तसेच, बीसीजी लस अशा विविध औषधे करोनाविरोधात किती प्रभावी ठरू शकतात यावर अधिक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.

चीनची हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी :

  • अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता चीनने हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली आहे.
  • तर हॉँगकॉँगमध्ये गेल्या काही दिवसांपासून या विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे.
  • अमेरिकेचा इशारा आणि आंदोलन याकडे लक्ष न देता चीनने विधेयकाला मंजुरी दिली आहे.
  • चीन सरकारने मंजूर केलेले विधेयक हे हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर आणि लोकशाही मूल्यांवर घाला घालणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र गुरुवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसने या विधेयकाला मंजुरी दिली.
  • तसेच या विधेयकाला 2878 जणांनी समर्थन दिले, एका सदस्याने विरोध केला तर सहा सदस्य या वेळी गैरहजर होते.
  • तर पुढील काही दिवसांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कायद्या अंतर्गत स्थानिकांचा हाँगकाँगमध्येच खटला चालविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली :

  • करोनाचा वाढता धोका लक्षात घेत कर्नाटक सरकारनं गुरूवारी मोठा निर्णय घेतला.
  • करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे संसर्ग वाढण्याची भीती असल्यानं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रासह पाच राज्यातून होणारी विमान, रेल्वे आणि इतर वाहनातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक थांबवली आहे.
  • करोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकनं थांबवली आहे.
  • तर महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.

17 जून पासून प्रिमीअर लिग स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार :

  • जर्मन सरकारने Bundesliga स्पर्धेला मान्यता दिली. यानंतर प्रेक्षकांव्यतिरीक्त या सामन्यांना सुरुवातही झाली.
  • तर यानंतर स्पेन सरकारनेही 8 जून पासून La Liga स्पर्धेला मान्यता दिली.
  • तसेच यानंतर फुटबॉलप्रेमींमध्ये मानाचं स्थान असलेल्या इंग्लिश प्रमिअर लिग स्पर्धेला 17 जून पासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.
  • मँचेस्टर सिटी विरुद्ध आर्सेनल आणि अ‍ॅस्टन व्हिला विरुद्ध शेफील्ड युनायडेट हे संघ 17 तारखेला सामना खेळतील.

दिनविशेष :

  • 29 मे : जागतिक पचन स्वास्थ्य दिन
  • पीटर (दुसरा) रशियाचा झार 29 मे 1727 मध्ये बनला.
  • 29 मे 1848 मध्ये विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य झाले.
  • 29 मे 1906 रोजी भारतीय-इंग्लिश लेखक टी.एच. व्हाईट यांचा जन्म झाला.
  • एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचा जन्म 29 मे 1914 रोजी झाला.
  • अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या सामान्य सापेक्षता सिद्धांताची चाचणी 29 मे 1919 रोजी घेण्यात आली.
  • 29 मे 1987 हा दिवस भारताचे 5वे पंतप्रधान ‘चौधरी चरणसिंग‘ यांचा स्मृतीदिन आहे.

Check Also

PMC Panvel Bharti 2022

PMC Panvel Bharti 2022 : पनवेल महानगरपालिका येथे रिक्त पदांची भरती

PMC Panvel Recruitment 2022 PMC Panvel Bharti 2022: Panvel Municipal Corporation has declared the recruitment …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा