Wednesday , May 1 2024

29 डिसेंबर 2020 चालू घडामोडी

चालू घडामोडी (29 डिसेंबर 2020)
कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर :
तीन आठवड्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत मंजूरी मिळाल्यानंतर कर्नाटकच्या कॅबिनेटने सोमवारी ‘गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक 2020’ मंजूर केले.
तर आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी त्यावर मोहोर उठवल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.
तसेच या नव्या विधेयकानुसार, गायींची अवैध विक्री, अवैध वाहतूक दंडनीय अपराध असणार आहे.
जर गायीला एखादा संसर्गजन्य आजार जडला ज्यामुळे इतर गुरांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, अशाच वेळी त्या गायीची कत्तल केली जाऊ शकते, असं कर्नाटकचे कायदा मंत्री जे. सी. मधूस्वामी यांनी म्हटलं आहे.
तर या विधेयकातील सेक्शन 1 (2) नुसार, गुरं म्हणजे गाय, गायीचं वासरु आणि बैल तसेच 13 वर्षांखालील म्हैस किंवा रेडा यांचा समावेश आहे.
या विधेयकानुसार, जर गोहत्या घडून आल्यास गुन्हा दाखल होऊन तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.
तसेच या शिक्षेसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 50,000 ते 5 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.

देशातील चालकरहित पहिल्या मेट्रोला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा :
देशातील पहिली चालकविरहित मेट्रो ट्रेन दिल्लीत सुरु झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला हिरवा झेंडा दाखवला.
राजधानी दिल्लीत देशातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित चालकविरहित मेट्रो ट्रेन सोमवारपासून सुरु झाली.
तर दिल्ली मेट्रोच्या मॅजन्टा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे.
देशात सन 2014 मध्ये केवळ 248 किमी इतक्या अंतरावर मेट्रो लाईन सुरु होत्या. आज तीनपट जास्त म्हणजेच 700 किमी अंतरावर मेट्रो धावत आहेत.
ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना राज्य सरकारचे अर्थसाहाय्य :
टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंना सोमवारी राज्य सरकारद्वारे प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला.
राज्यातील खेळाडूंना पूर्वतयारीसाठी एकूण अडीच कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आला.
तर या खेळाडूंमध्ये नेमबाज राही सरनोबत, नेमबाज तेजस्विनी सावंत, धावपटू अविनाश साबळे तसेच पॅरालिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकर आणि तिरंदाज प्रवीण जाधव यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले.
ICC पुरस्कारावर धोनी-विराटची छाप :
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एम. एस. धोनी यांनी आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे) पुरस्कारावर ठसा उमटवला आहे.
तर दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू असे मानाचे पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत.
तसेच धोनीला दशकातील ‘खेळभावना’पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या स्टिव स्मिथला दशकातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आलं आहे.
तर अफगाणिस्तानच्या राशिद खानची दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
दशकातील सर्वोत्तम महिला एकदिवसीय, टी-20 क्रिकेटपटू आणि रेचेल हेयोइ फ्लिंट पुरस्कारावर ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीनं नाव कोरलं आहे.
करोना आर्थिक मदत योजनेवर ट्रम्प यांची स्वाक्षरी :
अमेरिकी लोकांना करोना काळात येत असलेल्या अनेक अडचणी पाहून 900 अब्ज डॉलर्सच्या मदतीचा समावेश असलेले 2.3 लाख कोटी डॉलर्सचे खर्च विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
तर त्यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर स्वाक्षरी केली, अन्यथा अमेरिकेवर आर्थिक टाळेबंदीची नामुष्की येण्याचा धोका होता. कारण अनेक सेवांवरचा खर्च सरकारने मंजूर करणे गरजेचे असते अन्यथा त्या ठप्प होऊ शकतात.
ट्रम्प हे 20 जानेवारीला व्हाइट हाऊस सोडणार असून त्यांनी अखेर हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
तसेच ट्रम्प यांनी जे विधेयक मंजूर केले आहे त्यातील 1.4 लाख कोटी डॉलर्स हे सरकारी संस्था चालवण्यासाठी आहेत. त्यामुळे सरकारी संस्थांचा सप्टेंबपर्यंतचा खर्चही भागणार आहे.
दिनविशेष:
काँग्रेसचे पहिले अध्यक्ष ‘व्योमकेशचंद्र बॅनर्जी‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1844 मध्ये झाला होता.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 मध्ये झाला होता.
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ‘रामानंद सागर‘ यांचा जन्म 29 डिसेंबर 1917 रोजी झाला होता.
सन 1930 मध्ये सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला होता.
सन 1959 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही Nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at Majhi Naukri. With a background in Computer Engineering, Dhanshri’s skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. his blogs are sought after for intimate details while using simple language.

Check Also

PMC Panvel Bharti 2022

PMC Panvel Bharti 2022 : पनवेल महानगरपालिका येथे रिक्त पदांची भरती

PMC Panvel Recruitment 2022 PMC Panvel Bharti 2022: Panvel Municipal Corporation has declared the recruitment …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा