Friday , April 26 2024

23 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

 

आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला:

चालू घडामोडी (23 सप्टेंबर 2020)

आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला:

  • जगात सर्वात जास्त सेवा केलेल्या आयएनएस विराट या युद्धनौकेचा अखेरचा प्रवासही संपला असून ती मुंबईहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचली असल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
  • भारतीय नौदलात 1987 मध्ये सामील करण्यात आलेली ही युद्धनौका श्रीराम ग्रुपकडून यावर्षी जुलैत 38.54 कोटी रुपयांना घेण्यात आली आहे.
  • आयएनएस विराट ही जगातील सर्वाधिक काळ सेवा केलेली युद्धनौका असून ती सेंटॉर वर्गातील दुसरी विमानवाहू युद्धनौका होती.
  • 29 वर्षे ती नौदलाच्या सेवेत होती व मार्च 2017 मध्ये ती सेवेतून बाद करण्यात आली.

जोकोव्हिचला पाचवे विजेतेपद- इटालियन खुली टेनिस स्पर्धा :

  • सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली.
  • जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला 7-5, 6-3 असे पराभूत केले.
  • हे विजेतेपद पटकावत पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे जोकोव्हिचने सिद्ध केले.
  • सरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले.

दिनविशेष :

  • 23 सप्टेंबर 1803 मध्ये दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
  • अर्बेन ली व्हेरिअर यांनी 23 सप्टेंबर 1846 मध्ये नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
  • महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना 23 सप्टेंबर 1884 मध्ये स्थापन केली.
  • कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना 23 सप्टेंबर 1908 मध्ये झाली.
  • 23 सप्टेंबर 1932 मध्ये हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
  • सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा 23 सप्टेंबर 1983 मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

 

Check Also

Nagar Panchayat Nandgaon Bhart 2022

Nagar Panchayat Bharti 2022 : नगरपंचायत नांदगाव- खंडेश्वर, जि. अमरावती येथे रिक्त पदांची भरती

Nagar Panchayat Nandgaon Recruitment 2022 Nagar Panchayat Nandgaon Bharti 2022: Nagar Panchayat Nandgaon has declared …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा