19 डिसेंबर 2020 चालू घडामोडी

रॉबर्ट लेवांडोस्की
चालू घडामोडी (19 डिसेंबर 2020)
करोनामुळे परीक्षा देता न आलेल्या UPSC उमेदवारांना मिळणार पुन्हा संधी :
करोनामुळे युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थींना पुन्हा संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
परीक्षार्थींना पुन्हा एक देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. या याचिकेवर ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.
तर यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार व युपीएससी आयोगाला सल्ला दिला. करोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं सांगितलं.
केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उमेदवारांना पुन्हा एक संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान या याचिकेवर पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे.

रेल्वेची महत्त्वाची योजना :
भारतीय रेल्वेने आखलेल्या ‘नॅशनल रेल प्लॅन (एनआरपी) 2030’अंतर्गत रेल्वे तिकिटांची प्रतीक्षा यादी संपविण्यात येणार असून, सर्व तिकिटे निश्चित (कन्फर्म) करण्यात येणार आहेत.
‘एनआरपी 2030’ ही योजना सार्वजनिक सल्लामसलतीसाठी, तसेच विविध हितधारक आणि मंत्रालयाकडून अभिप्राय मागविण्यासाठी सार्वजनिक करण्यात येणार आहे.
‘एनआरपी 2030’मध्ये पायाभूत सुविधांची उभारणी आणि महसूलनिर्मिती यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीने रेल्वेच्या मालवाहतुकीत वाढ होईल.
तर देशातील एकूण मालवाहतुकीत 47 टक्के हिस्सेदारी मिळविण्याची रेल्वेची योजना आहे.
रेल्वे आणखी चार समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर 2030 पर्यंत उभारणार आहे. नवे मालवाहतूक कॉरिडॉर सरकारी-खाजगी भागीदारीत (पीपीपी) उभारले जातील. त्यामुळे रेल्वेचा मालवाहतूक काळ कमालीचा कमी होईल.
रॉबर्ट लेवांडोस्कीने कोरले‘फिफा’च्या सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव :
अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले.
तर महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.
झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.
तसेच 32 वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक 55 गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.
विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धात सिम्रनजीत अंतिम फेरीत :
जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या सिम्रनजीत कौरने शुक्रवारी युक्रेनच्या मरियाना बॅसानेटसचा पराभव करून जर्मनीत सुरू असलेल्या कॉलोग्न विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
आशियाई रौप्यपदक विजेत्या सिम्रनजीतने मरियानाला 4-1 असे पराभूत करीत शनिवारी होणाऱ्या सुवर्णपदकाच्या लढतीमधील स्थान निश्चित केले.
तर त्याआधी, दोन वेळा जागतिक पदक विजेत्या सोनिया लाथेरने युक्रेनच्या स्निझहाना खोलोडकोव्हाचा 3-2 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
दिनविशेष:
19 डिसेंबर हा दिवस ‘गोआ मुक्ती दिन‘ आहे.
भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती ‘प्रतिभा पाटील‘ यांचा जन्म 19 डिसेंबर 1934 मध्ये झाला.
सन 1961 मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
व्ही.एन. खरे यांनी सन 2002 मध्ये भारताचे 33वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता.

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at Majhi Naukri. With a background in Computer Engineering, Dhanshri’s skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. his blogs are sought after for intimate details while using simple language.

Check Also

PMC Panvel Bharti 2022

PMC Panvel Bharti 2022 : पनवेल महानगरपालिका येथे रिक्त पदांची भरती

PMC Panvel Recruitment 2022 PMC Panvel Bharti 2022: Panvel Municipal Corporation has declared the recruitment …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा