चालू घडामोडी : २५ जानेवारी २०२१ | Mission MPSC

AdvertisementsCurrent Affairs : 25 January 2021डेन्मार्कच्या ‘इन टू द डार्कनेस’ या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कारदुसऱ्या महायुद्धावर आधारित डेन्मार्कचा चित्रपट ‘इन टू द डार्कनेस’ ने ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन पीकॉक पुरस्कार पटकावला.तैवानी चेन निएन को यांच्या द सायलेंट फॉरेस्ट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून, तर याच चित्रपटासाठी त्सु शॉन लिऊ याला उत्कृष्ट अभिनेता तर पोलिश झोफिया स्ताफिज हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार मिळाला.दिग्दर्शक अँडर्स रेफ व निर्माता लेन बोरग्लम यांना रोख ४० लाख रुपये देण्यात येतील.सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रौप्य मयूर पुरस्काराने १७ वर्षीय त्सु शॉन लियू याला गौरविण्यात आले. प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ”आय नेव्हर क्राय” या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे. स्टॅफिएजला पुरस्कार स्वरूपात १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र मिळाले.इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानीनीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ मध्ये महाराष्ट्राने देशातील अव्वल राज्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘ इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ‘ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आले आहे.राज्याने २०१९ मध्ये असलेल्या तिसऱ्या (Maharashtra In India Innovation Index 2020) क्रमांकावरून २०२० मध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची तुलनात्मक कामगिरी पाहून रँकिंग देण्याचे काम केले जाते.हा अहवाल तयार करीत असताना नाविन्यपूर्ण योजना सुधारण्यासाठी त्यांची बलस्थाने व कमकुवत बाबींचा अभ्यास केला जातो.हा इंडेक्स तयार करण्यासाठी नवनिर्मितीची दोन परिमाणे ठरलेली आहेत.यात इनोव्हेशन कॅपबिलिटीज व इनोव्हेशन आऊटकम्स यांचा अनुक्रमे समावेश होतो. शेवटचा इंडिया इनोव्हेशन इंडेक्स हा ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. राज्य व केंद्रशासित प्रदेशांची इनोव्हेशन कॅपबिलिटीजचे मूल्यांकन करणारा अशा प्रकारचा हा अहवाल गतवर्षी पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आला आहे.राज्यातील अनेक शासकीय विभागांच्या तसेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई फिनटेक हब इत्यादींच्या एकत्रित प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य हे इंडिया इनोव्हेशन इंडेक्समध्ये देशात दुसरे आले आहे.९४ व्या साहित्य संमेलनअध्यक्षपदी डाॅ. नारळीकरनाशिक येथील नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक पद्मविभूषण डाॅ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.लाेकहितवादी मंडळातर्फे २६ ते २८ मार्चदरम्यान नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार अाहे.साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाशिक येथील बैठकीत १० संस्था, घटक संस्था अाणि विद्यमान संमेलनाध्यक्ष अशा १९ जणांच्या मतमतांतरानंतर डाॅ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.संचलनात प्रथमच सामील होईल बांगलादेशचे सैन्य२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच बांगलादेशाचे सैन्य सामील होईल.११३ जवानांचे पथक एका सैन्य बँडसह संचलनात सहभागी होईल.बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या अर्धशतकानिमित्त संचलनात त्यांचे सैन्य सहभागी होत आहे.कॅराेलिना मरीन, व्हिक्टर एक्लेलसनला किताबऑलिम्पिक चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारीन आणि डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्लेलसनने थायलंड ओपनचे विजेतेपद पटकावले.थायलंडमध्ये जैवसुरक्षित वातावरणात प्रेक्षकांविना दोन आठवड्यांत दुसऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.महिला एकेरीच्या अंतिम फेरीत मारीनने अव्वल मानांकित ताय जू यिंगला २१-१९, २१-१७ ने पराभूत केले.हा सामना ४८ मिनिटे चालला. मारीनने १५ दिवसांत आपला दुसरा किताब जिंकला. पुरुष एकेरीत व्हिक्टरने हान्स क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगुसला ४० मिनिटांत २१-११, २१-०७ ने हरवले.

Check Also

PMC Panvel Bharti 2022

PMC Panvel Bharti 2022 : पनवेल महानगरपालिका येथे रिक्त पदांची भरती

PMC Panvel Recruitment 2022 PMC Panvel Bharti 2022: Panvel Municipal Corporation has declared the recruitment …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा