NMDC Steel Limited bharti 2025: सरकारी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

NMDC Steel Limited Recruitment 2025

Advertisement

NMDC Steel Limited (NMDC Steel Limited bharti 2025) ही भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयांतर्गत कार्यरत एक प्रतिष्ठित कंपनी आहे. कंपनीने विविध व्यवस्थापन आणि तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. छत्तीसगडमधील नागरनार येथे 24,000 कोटींच्या गुंतवणुकीसह उभारण्यात आलेल्या या स्टील प्रकल्पाचा उद्देश हॉट रोल्ड स्टील बाजारपेठेत महत्त्वपूर्ण स्थान मिळवणे आहे.

या भरती अंतर्गत डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM), असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM), सिनियर मॅनेजर (SM), मॅनेजर (MGR), डेप्युटी मॅनेजर (DM), आणि असिस्टंट मॅनेजर (AM) या पदांसाठी एकूण 246 जागा उपलब्ध आहेत.


महत्त्वाची माहिती:

  • जाहिरात क्रमांक: NSL/Per/R&P/Rec/2024
  • एकूण जागा: 246
  • नोकरी ठिकाण: नागरनार, छत्तीसगड
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • अर्जाची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2025

रिक्त पदांचा तपशील:

Advertisement

पद क्रमांकपदाचे नावजागा
1डेप्युटी जनरल मॅनेजर (DGM)11
2असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM)34
3सिनियर मॅनेजर (SM)76
4मॅनेजर (MGR)48
5डेप्युटी मॅनेजर (DM)48
6असिस्टंट मॅनेजर (AM)29

वयोमर्यादा: (07 एप्रिल 2025 रोजी)

  • DGM: 52 वर्षांपर्यंत
  • AGM ते AM: 45 वर्षांपर्यंत
  • शासन नियमानुसार सूट: SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे

फीस:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD/ExSM: शुल्क नाही

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

Advertisement

पदशैक्षणिक पात्रताअनुभव
DGMसंबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (Electrical / Electrical & Electronics/ Mechanical / Power Plant/ Thermal/ Power/ Metallurgy/ Chemical/ Instrumentation)15 वर्षे
AGMसंबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी12 वर्षे
SMसंबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी10 वर्षे
MGRसंबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी07 वर्षे
DMसंबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी04 वर्षे
AMसंबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी02 वर्षे

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 एप्रिल 2025

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  3. ऑनलाईन अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. फी भरून अर्ज सबमिट करा.
  5. अर्जाची प्रिंटआउट घेऊन ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स:

ही भरती स्टील उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज भरावा.

👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group