Mumbai Jilha Kshayrog Niyantran Sanstha Bharti 2025: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असूनही, या भरतीसाठी लागणारी पात्रता, पगार आणि पदसंख्या पाहून अनेकजण थक्क होणार आहेत. विशेष म्हणजे, ही भरती थेट मुंबईत होणार असून, एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 13 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Advertisementमुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेकडून अधिकृत भरती जाहीर करण्यात आली असून, एकूण 51 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी (SRMO), सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी), TB हेल्थ व्हिजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, सांख्यिकी सहाय्यक, पीपीएम समन्वयक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (SR.LT) अशा विविध पदांचा समावेश आहे.
🧾 मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2025 भरतीचे संपूर्ण तपशील:
▪️ पदसंख्या: 51
▪️ शेवटची तारीख: 25 एप्रिल 2025
▪️ अर्ज पद्धत: ऑफलाइन
▪️ अधिकृत वेबसाईट: https://mumbaicity.gov.in, www.tbcindia.gov.in
📌 मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था भरती 2025 पदांनुसार जागा:
Advertisementपदाचे नाव | जागा |
---|---|
वैद्यकीय अधिकारी | 08 |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (SRMO) | 04 |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
एपिडेमियोलॉजिस्ट (APO) | 01 |
वरिष्ठ DOTS Plus TB-HIV पर्यवेक्षक | 02 |
सांख्यिकी सहाय्यक | 01 |
TB हेल्थ व्हिजिटर | 16 |
औषध निर्माता | 01 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 01 |
PPM समन्वयक | 01 |
भांडार सहाय्यक | 01 |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | 05 |
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 08 |
📮 अर्ज पाठविण्याचा पत्ता:
मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था,
उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय,
पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय,
व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड,
चिंचपोकळी (पूर्व), मुंबई – ४०००१२
💸 अर्ज शुल्क:
▪️ खुला वर्ग: ₹150/-
▪️ राखीव वर्ग: ₹100/-
💰 वेतनश्रेणी (पदांनुसार):
Advertisementपद | वेतन |
---|---|
वैद्यकीय अधिकारी / SRMO | ₹60,000/- प्रतिमहा |
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | ₹40,000 – ₹75,000/- |
एपिडेमियोलॉजिस्ट | ₹55,000/- (+ ₹5,000/- MBBS असल्यास) |
TB हेल्थ व्हिजिटर | ₹15,500/- + ₹1,500/- (TA) |
औषध निर्माता, लॅब तंत्रज्ञ, स्टोअर सहाय्यक | ₹17,000/- |
PPM समन्वयक, उपचार पर्यवेक्षक | ₹20,000/- |
सांख्यिकी सहाय्यक | ₹30,000/- |
वरिष्ठ लॅब तंत्रज्ञ | ₹25,000/- |
📚 शैक्षणिक पात्रता:
▪️ वैद्यकीय अधिकारी / वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS / डिप्लोमा / MD
▪️ इतर पदांनुसार पदवी / डिप्लोमा / संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
🔗 महत्वाच्या लिंक्स:
✅ अधिकृत जाहिरात PDF डाऊनलोड करा
✅ अर्ज प्रक्रिया आणि माहिती