कृषि महाविद्यालय मध्ये 4थी, 8वी, व इतर पात्रता असणाऱ्या उमेदवारांची भरती सुरू! | Krushi Mahavidyalaya Bharti 2025
Krushi Mahavidyalaya Bharti 2025: कृषि महाविद्यालय, अंतर्गत वसतिगृह विभागांतर्गत रिक्त पद भरण्यासाठी सोबत जोडलेल्या नमुन्यात शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 4थी, 8वी, व इतर अहर्ता पात्र असणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
महत्वाचे सूचना:
- उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भरती विभाग:
कृषि महाविद्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव:
खाली दिलेली अधिकृत जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता:
4थी / 8वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

मासिक मानधन / वेतन:
15,000/- रूपये दिले जाणार आहे.
अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती:
खाली दिली आहे.
भरतीची पद्धत:
ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया:
मुलाखत.
वयोमर्यादा:
38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधी:
निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिने करीता रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव:
वाहन चालक.
Krushi Mahavidyalaya Bharti 2025 इतर आवश्यक पात्रता:
- इयत्ता 8 वी पास.
- जड वाहन चालविण्याचा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना किंवा.
- इयत्ता 4 थी पास व जड वाहन चालविण्यास सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला परवाना आणि 5 वर्षांचा जड वाहन चालविण्याचा अनुभव.
- या विद्यापीठात सेवेत वाहनचालक म्हणून तात्पुरत्या/रोजंदारी स्वरुपात काम करीत असलेल्यासाठी 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव.
एकूण पदे:
01 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण:
रत्नागिरी.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख:
03 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, दापोली (वसतिगृह विभाग).
अर्जाच्या लखोटयावर: वाहन चालक पदासाठी अर्ज वसतिगृह विभाग असा ठळक उल्लेख करावा.
मुलाखत व निवड प्रक्रिया:
पात्र उमेदवारांच्या निवड समितीद्वारे मुलाखती तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील.
मुलाखतीला येताना अर्जाला जोडलेले सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ प्रती सोबत आणाव्यात.
मुलाखतीला बोलावलेले उमेदवारांना प्रवास व दैनिक भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
महत्वाचे नियम व अटी:
- निवड झालेल्या उमेदवाराला रू. 100/- किमतीच्या सॅंड पेपरवर नियुक्ती कालावधीत नोकरी सोडून जाता येणार नाही, असे लिहून दयावे लागेल.
- उमेदवारास कामाचे मुल्यमापन करण्यात येईल, आणि काम असमाधानकारक असल्यास नियुक्ती रद्द केली जाऊ शकते.
- नियुक्त झालेल्या उमेदवारास कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याचा कोणताही हक्क राहणार नाही.
- उमेदवाराला नोकरी सोडावयाची असल्यास त्याने लेखी कळवून एक महिना आधी सूचित करावा, नाहीतर त्याचा एक महिन्याचा पगार कापला जाईल.
अर्ज कसा करावा:
अधिक माहितीसाठी, व PDF जाहिरात व अर्जासाठी, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
PDF जाहिरात व अर्ज – येथे क्लीक करा
तुमच्या या संधीचा लाभ घ्या आणि शेवटच्या तारखेला अर्ज करायला विसरू नका!