मुंबईच्या एका नामांकित संस्थेत संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण कधी संधी समोर येते ते समजतेच नाही. यंदा मात्र एका नव्या भरतीमुळे इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
AdvertisementCentral Institute of Fisheries Education Bharti 2025 अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती होणार असून, मुंबईत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले तपशील वाचा.
Central Institute of Fisheries Education Mumbai Bharti 2025 तपशील
नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी Central Institute of Fisheries Education Mumbai ने फील्ड असिस्टंट पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना 13 मे 2025 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे.
भरतीचे संक्षिप्त तपशील
- भरतीचे नाव: Central Institute of Fisheries Education Mumbai
- पदाचे नाव: फील्ड असिस्टंट
- एकूण जागा: 01
- नोकरी ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र
- वेतनश्रेणी: रु. 25,000/- प्रतिमाह
- वयाची अट: 21 ते 45 वर्षे
- अर्ज पद्धत: ऑफलाइन (Walk-in Interview)
महत्त्वाच्या लिंक्स
रिक्त पदांचा तपशील
Advertisementपदाचे नाव | जागा संख्या |
---|---|
फील्ड असिस्टंट | 01 |
शैक्षणिक पात्रता
फील्ड असिस्टंट
- उमेदवारांनी Biological Science मध्ये पदवी घेतलेली असावी.
अर्ज कसा करायचा?
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
- अर्जाचा नमुना अधिकृत PDF मध्ये दिला आहे.
- अर्जासोबत सर्व आवश्यक शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
- मुलाखतीचे ठिकाण:
ICAR-Central Institute of Fisheries Education (Deemed University),
पंच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई – 400061.
महत्त्वाच्या तारखा
- थेट मुलाखत दिनांक: 13 मे 2025