फक्त 10वी पास साठी – कॅनरा बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! । Canara Bank Bharti 2025

WhatsApp Group     Join Now
Instagram Group     Join Now

Canara Bank Bharti 2025: खरा सोन्याचा भाव वाढला की… बँकेत सोनं घेऊन जाणाऱ्यांची गर्दी वाढते. पण या गर्दीत एक वेगळी संधी निर्माण झाली आहे – कारण कॅनरा बँकेत आता सोन्याचं मूल्य ठरवणारे अधिकाऱ्यांची भरती होणार आहे. बँकेच्या विविध शाखांमध्ये ‘गोल्ड अप्रेझर’ पदासाठी भरती सुरू झाली आहे, पण त्यामागे एक वेगळी गरज आणि महत्त्व आहे…

Advertisement

कॅनरा बँकेच्या छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, धाराशिव, नांदेड, बीड आणि परभणी येथील शाखांमध्ये ‘गोल्ड अप्रेझर’ पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदसंख्या जरी निश्चित नसली तरी विविध शाखांमध्ये भरती केली जाणार आहे. ही भरती 9 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे.

Canara Bank Bharti 2025 – तपशील

  • भरतीचे नाव : कॅनरा बँक गोल्ड अप्रेझर भरती 2025
  • पदाचे नाव : गोल्ड अप्रेझर (Gold Appraiser)
  • एकूण जागा : विविध
  • नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर, लातूर, जालना, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी
  • वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत
  • निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
  • मुलाखतीची तारीख : 9 ते 21 एप्रिल 2025

canara bank recruitment 2025 अर्जाची पद्धत

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा
  • अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
  • इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे :
    कॅनरा बँक, प्रादेशिक कार्यालय, प्लॉट नं. 9-12, विघ्नेश टॉवर, नियर 7 हिल्स, सुराना नगर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – 431001
Advertisement

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटcanarabank.com

कॅनरा बँक भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता व अनुभव

  • किमान 10वी उत्तीर्ण असावा
  • सोन्याचे मूल्यांकन करण्याचा अनुभव आवश्यक

👉 तुम्हाला जर तुमचं क्षेत्र सोन्यात बदलायचं असेल, तर ही एक सुवर्णसंधी आहे!


👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Mahesh Gaikwad Founder & CEO of Majhi Naukri and 5 years of experience writing about government schemes, recruitment, and educational topics. I also worked for TV9 as a Marathi content writer.

Leave a Comment

Join WhatsApp Group