Saturday , April 20 2024

5 जानेवारी 2021 चालू घडामोडी


ख्रिस्तियानो रोनाल्डो
चालू घडामोडी (5 जानेवारी 2021)
रोनाल्डोकडून पेले यांचा विक्रम मोडित :
ख्रिस्तियानो रोनाल्डोने ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा 757 गोलचा विक्रम मोडित काढला.
रोनाल्डोने आतापर्यंतच्या कारकीर्दीत सर्वप्रकारच्या सामन्यांत नोंदवलेल्या अधिकृत गोलांची संख्या 758 झाली असून त्याच्या दोन गोलमुळेच युव्हेंटसने झालेल्या सेरी-ए लीग फुटबॉलमधील सामन्यात उडिन्सला 4-1 अशी धूळ चारली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोनाल्डोने 31व्या मिनिटाला पहिला गोल झळकावून पेले यांच्या विक्रमाची बरोबरी साधली.
तर उत्तरार्धात 70व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावून त्याने पेलेंचा विक्रम मोडित काढला.
तसेच आता फक्त माजी फुटबॉलपटू जोसेफ बिकान रोनाल्डोपेक्षा पुढे आहेत.

ब्रिटनमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा :
पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमध्ये लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे.
तर जवळपास पाच कोटी जनता पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये परतणार असल्याचं त्यांनी सोमवारी सांगितलं.
तसेच फेब्रुवारीच्या मध्यात हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे.
करोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी हा लॉकडाउन लागू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं असून याची सुरुवात शाळांपासून होणार आहे.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम लवकरच :
औषध नियंत्रक संस्थेने कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर आता जगातील सर्वात मोठी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम भारतात सुरू होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तर या लशी भारत निर्मित असून त्यात आपले वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांनी मोठी भूमिका पार पाडली, अशा शब्दात पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
तसेच ते म्हणाले, की जगातील सर्वात मोठा कोविड 19 लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू होत असून त्यात वैज्ञानिक व तंत्रज्ञ यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी सोमवारी ऑक्सफर्डची कोविड 19 लस म्हणजे सीरमची कोव्हिशिल्ड व भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.
दिनविशेष:
महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी सन 1924 मध्ये खुले केले.
5 जानेवारी 1949 रोजी पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
पश्चिम बंगालच्या 8व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये झाला.
सन 1957 मध्ये विक्रीकर कायदा सुरू झाला.
ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ ‘गेरहार्ड फिशर‘ यांना सन 1998 मध्ये कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात
भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.










Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at Majhi Naukri. With a background in Computer Engineering, Dhanshri’s skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. his blogs are sought after for intimate details while using simple language.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा