Advertisements

चालू घडामोडी (26 मे 2020)
सर्वाधिक पीपीई कीट बनवणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी :
- करोनाचा देशात उद्रेक होण्यापूर्वी भारतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट बनवणारी एकही फॅक्टरी नव्हती.
पण, 18 मे पर्यंत तब्बल 4.5 लाख पीपीई किट्स प्रतिदिन तयार केले जाऊ लागले. गुंतवणूक सुविधांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या इनव्हेस्ट इंडिया या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या एका माहितीपुस्तिकेत ही माहिती दिली आहे. - तर संदर्भासाठी 30 मार्च ही तारीख घेतल्यास या दिवशी भारतात प्रतिदिन 8,000 पीपीई किट तयार केले जात होते.
तसेच त्यानंतर हा अकडा वाढतच गेला. त्यामुळे पीपीई किट बनवणाऱं हे क्षेत्रचं आता 7,000 कोटी रुपयांची उलाढाल असलेली बाजारपेठ बनली आहे. - पीपीई किटमध्ये मास्क (एन 95), ग्लोव्ह्ज (सर्जिकल आणि तपासणी), कोव्हराल्स (चेन असलेला पूर्ण लांबीचा बाहेरील कोट) आणि गाऊन, हेड कव्हर, गॉगल, फेस शिल्ड आणि शू कव्हर या गोष्टींचा समावेश असतो.
- तर आजच्या घडीला भारतात 600 पेक्षा अधिक कंपन्यांना पीपीई किट तयार करण्यासाठी प्रमाणित करण्यात आलं आहे.
चीन सध्या सर्वाधिक पीपीई किट बनवणे आणि त्याची निर्यात करण्यामध्ये जगाचं नेतृत्व करीत आहे. भारतीय पीपीई किट उत्पादकांसाठी अमेरिका आणि आशिया खंडातील देश ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे.
‘फ्लाईंग बुलेट्स’ ‘तेजस’ची दुसरी स्क्वाड्रन सज्ज :
- येत्या 27 मे रोजी तामिळनाडूत सुलूरमध्ये इंडियन एअर फोर्सची ‘फ्लाईंग बुलेट्स’ ही 18 नंबरची स्क्वाड्रन कार्यान्वित होणार आहे.
- स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’या फायटर विमानाने ही स्क्वाड्रन सुसज्ज असेल.
- तर IAF मधील ‘तेजस’ची ही दुसरी स्क्वाड्रन आहे. एअर फोर्स प्रमुख आर.के.एस. भदौरिया यांनी ही माहिती दिली.
- तेजसची पहिली स्क्वाड्रन सुद्धा याच सुलूर एअरबेसवर तैनात आहे. 2016 साली कार्यान्वित झालेल्या या स्क्वाड्रनमध्ये सुरुवातीला दोन फायटर विमाने होती.
- एअर फोर्सने आतापर्यंत 40 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विमानांची निर्मिती केली आहे.
- तसेच मार्च महिन्यात संरक्षण मंत्रालयाने एचएएलकडून 83 LCA Mk-1A तेजस विमाने खरेदी करण्याची परवानगी दिली. पुढच्या काही महिन्यात या संबंधीच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते.
- तर हा एकूण व्यवहार 38 हजार कोटी रुपयांचा आहे. LCA Mk-1A हे तेजसचे आणखी अत्याधुनिक स्वरुप असणार आहे.
- तेजस विमानाची निर्मिती केल्यापासून त्यात सतत सुधारणा सुरु आहेत. स्वदेशात बनवण्यात आलेले हे चौथ्या पिढीचे फायटर विमान आहे.
महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन :
- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू आणि माजी कर्णधार बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. ते 95 वर्षांचे होते.
- तर तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतेपद मिळवलेल्या बलबीर सिंग यांना 8 मे रोजी मोहलीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- भारतीय हॉकी संघात आक्रमण फळीत (फॉरवर्ड) खेळणारे बलबीर सिंग हे एक प्रतिभावंत क्रीडापटू होते.
- तसेच 1948, 1952 आणि 1956 असे सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात त्यांचा समावेश होता.
- भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेत सर्वप्रथम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता.
- 1975 साली मलेशियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावली. बलबीर सिंग यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त :
- हिंदी महासागराखालील विशाल टेक्टॉनिक प्लेट फुटणार असल्याची धक्कादायक माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे.
- तर ही प्लेट येत्या काळात आपोआप दोन भागांत विभागली जाणार आहे. या प्लेटला भारत-ऑस्ट्रेलिया-मकर टेक्टोनिक प्लेट म्हणून ओळखले जाते.
- तसेच ही प्लेट अगदी हळूहळू विभक्त होत आहे, म्हणजेच एका वर्षात ही प्लेट 0.06 इंच (1.7 मिलीमीटर)ने विभक्त होत आहे.
- लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, या अभ्यासाचे संशोधक ओरेली कोडुरियर यांनी सांगितले की, ही एक अशी रचना नाही जी वेगवान वाटचाल करत आहे.
- तसेच ही प्लेट हळूहळू विभक्त होत असल्याचं प्रारंभी संशोधकांना समजलं नव्हतं, परंतु नंतर त्याचा सुगावा लागला. हिंदी महासागरामध्ये एका दोन भयंकर भूकंप झाल्यानंतर पाण्याखाली काही हालचाल झाल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे.
- 11 एप्रिल 2012ला हिंदी महासागरातील इंडोनेशियाजवळ 8.6 आणि 8.2 अशा तीव्रतेचे दोन भूकंप झाले. हे भूकंप टेक्टोनिकल प्लेटच्या आसपास नव्हते, परंतु या प्लेटच्या मध्यभागी असलेल्या एका वेगळ्या ठिकाणावर त्यांचं केंद्रबिंदू दाखवलं होतं.
- तर या भूकंपानंतर संशोधकांना असे वाटले की. पाण्याखाली काही हालचाल आहे. ऑरेली कोडुरियर म्हणाले की, “हे एक कोड्यासारखे आहे, कारण ते एकसारख्या प्लेट नसून तीन एकत्रित आहेत, ज्या जोडलेल्या आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्लेट्स विभक्त होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतील.
चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर :
- कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश एकीकडे आणि चीन एकीकडे असं चित्र बघायला मिळत आहे. अशातच चीनने त्यांचं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर (Unmanned Helicopter) तयार केलं आहे.
- तर हे हेलिकॉप्टर खासकरून पठारी भागांमध्ये गुप्तहेरी करेल.
- तसेच हे अत्याधुनिक मानवरहित हेलिकॉप्टर भारताशी जुळलेल्या सर्व सीमांवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून चीन आकाशातूनही सीमांवर लक्ष देऊ शकेल.
- या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तया केलं आहे. कंपनीने पूर्व चीनच्या जियांसी प्रांतातील पोयांगमध्ये पहिल्यांदा याची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी ठरली.
- तर यात शस्त्रास्त्रे लावली गेली तर हे हेलिकॉप्टर हल्लाही करू शकतं. कार्गो डिलीव्हरी करू शकतो. तसेच शत्रूच्या टार्गेटची ओळख पटवण्यातही हे सक्षम आहे. तसेच हे हेलिकॉप्टर परमाणू आणि रासयनिक लिकेजची देखील माहिती देतं.
- हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700 मीटर म्हणजे 21981 फूट उंचीपर्यत उड्डाण घेऊ शकतं. याची जास्तीत जास्त गति 170 किलोमीटर प्रतिसात आहे. तर याचं वजन 500 किलोग्रॅम आहे.
- AVIC टेक्नॉलॉजी डिरेक्टर आणि हे हेलिकॉप्टर तयार करणारे सायंटिस्ट फॅंग योगंहोंग यांनी सांगितले की, हे मानवरहित हेलिकॉप्टर पूर्णपणे डिजिटल आहे. हे आपोआप टेकऑफ आणि लॅंडिंग करू शकतं.
- तर हे चीनचं पहिलं हेलिकॉप्टर पठारी परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.
- फॅग योंगहोंग यांनी सांगितले की, आम्ही या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. यात चीनमधील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तीशाली इंजिन लावण्यात आलं आहे.
दिनविशेष :
- युरोपियन समुदायाने (EU) 26 मे 1986 रोजी नवीन ध्वज अंगीकारला.
- 26 मे 1989 मध्ये मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
- 26 मे 2014 रोजी श्री. नरेंद्र मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.
- आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक ‘बेन्जामिन पिअरी पाल’ यांचा जन्म 26 मे 1906 रोजी झाला.
Advertisements