Advertisements

चालू घडामोडी (25 मे 2020)
देशांतर्गत विमान सेवा आजपासून :
- टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज 50 विमानांची ये-जा होणार आहे.
- मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
- केंद्र सरकारने 25 मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे.
- तर महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.
- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने रविवारी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी अलगीकरणासंदर्भात राज्यांना स्वतंत्र नियमावली आखण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- तसेच विविध राज्य सरकारांनीही त्यानुसार नियमावली जाहीर केली आहे. मात्र, या नियमावलींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
माजी शरीरसौष्ठवपटू सत्यवान कदम कालवश :
- अनेक शरीरसौष्ठवपटू घडविणारे तसेच मुंबई आणि महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवाचे खरे राजदूत समजले जाणारे सत्यवान (भाई) कदम यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
- तर शरीरसौष्ठव खेळाचा प्रचार, प्रसार आणि प्रगतीसाठी स्वत:चे आयुष्य वाहून घेणारे भाई कदम हे पीळदार देहयष्टीचे शरीरसौष्ठवपटू होते.
- तसेच अनेक राष्ट्रीय स्पर्धामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले. 60च्या दशकात त्यांनी ‘भारत-श्री’चा बहुमान पटकावला होता.
शेतकऱ्यांना खरिपासाठी कर्जपुरवठ्यास बँका तयार :
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून यंदा 65 हजार 909 हेक्टरवर खरीप हंगाम घेतला जाणार आहे.
- कोरोनाच्या संकटाचा परिणाम खरिपाच्या उत्पादनावर होऊ नये, शेतकºयांची आर्थिक कुचंबणा होऊ नये, यासाठी शेतकºयांना पतपुरवठ्याच्या नावाखाली 166 कोटी 79 लाख रुपये कर्जपुरवठा करण्याचे नियोजन बँकांनी केले आहे.
- तर यापैकी आतापर्यंत पाच कोटींचे वाटप झाले, असे जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी निदर्शनास आणून दिले.
- यंदाच्या हंगामात हेक्टरी सरासरी भाताचे 26 क्विंटल, नागलीचे 12 क्विंटल, कडधान्य, तृणधान्य अनुक्रमे सहा क्विंटल आदी भरघोस उत्पादन घेण्यासाठी कृषी विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
- तसेच यामध्ये सार्वजनिक बँकांकडून 52 कोटी 50 लाखांचा पत (कर्ज) पुरवठा केला जाणार आहे. खाजगी बँकांकडून २0 कोटी नऊ लाख, ग्रामीण बँका चार कोटी २0 लाख आणि सर्वाधिक ९0 कोटी रुपयांचा पतपुरवठा सहकारी बँकांकडून केला जाणार आहे.
कोरोना लसीच्या माणसांवरील चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी:
- कोविड-19 विषाणूवर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी माणसांवर सुरू असलेल्या चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात त्या लसीने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत केल्याचे आढळून आले आहे.
- तर या पहिल्या टप्प्यातील चाचण्या अतिशय सुरक्षित पद्धतीने पार पडल्या आहे.
- प्रायोगिक तत्त्वावर बनविलेली कोरोना प्रतिबंधक लस 108 जणांना टोचण्यात आली. त्यामुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारशक्ती वाढून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा जोर कमी झाल्याचे आढळून आले.
- तसेच या संशोधनात बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ बायोटेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत.
- या लसीचे माणसांवर किमान सहा महिने प्रयोग केल्यानंतर जे निष्कर्ष हाती येतील, ते सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यावरून ही लस खरंच किती परिणामकारक आहे हे कळू शकेल.
दिनविशेष :
- 25 मे : आफ्रिकन मुक्ती दिन
- शिवाजी महाराज आग्रा येथे 25 मे 1666 मध्ये नजरकैदेत होते.
- क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म सन 1886 मध्ये 25 मे रोजी झाला.
- स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा 25 मे 1899 रोजी जन्म झाला.
- कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच 25 मे 1955 मध्ये जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
- चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी 25 मे 1977 रोजी उठवली. सुमारे 10 वर्षे ही बंदी अमलात होती.
- विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना 1991चा ज्ञानपीठ पुरस्कार 25 मे 1992 रोजी जाहीर झाला.
Advertisements