Advertisements

चालू घडामोडी (23 मे 2020)
पश्चिम बंगालला आणि ओडिशाला अंतरिम साहाय्य :
- चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपयांचे तर ओडिशाला 500 कोटी रुपयांचे अंतरिम साहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.
- तरमोदी यांनी शुक्रवारी राज्यपाल जगदीप धनखार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत चक्रीवादळग्रस्त परिसराची हवाई पाहणी केली.
- तसेच उत्तर 24 परगणा जिल्ह्य़ातील बासिरहाट येथे धनखार, बॅनर्जी आणि राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदी यांनी, चक्रीवादळात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी 30 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.
हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली :
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले.
- तर रेपो रेट कमी करण्याबरोबर कर्जदारांना त्यांनी मोठा दिलासा दिला.
- तसेच सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचं ओझं वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. ती मुदत आता आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे.
- तर आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल.
- कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.
- करोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली.
ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा 30 मे रोजी :
- अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेकडून (एआयसीएफ) पहिल्यावहिल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे 30 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे.
- तर स्पर्धेत जर 26 मेपूर्वी प्रवेश घेतला तर 600 रुपये भरावे लागतील. 26 मेनंतर प्रवेश घेणाऱ्यांना 700 रुपये भरावे लागतील.
- तसेच विविध वयोगटांतील खेळाडूंसाठी या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रेणीप्रमाणे आणि वयोगटाप्रमाणे बक्षीस रक्कम ठरवण्यात आली आहे.
- lichess.org या संकेतस्थळावर हे सामने खेळायचे
स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा 1 जून नंतरच :
- लॉकडाऊन दरम्यान कर्मचारी भरती आयोगाने म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती परीक्षांबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे.
- देशातील कोविड – 19 विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की 1 जून 2020 रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.
- तर अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
- तसेच आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे.
परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्राच्या गुणांकात सुधारणा :
- मानव संसाधन विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या पिजीआय म्काहणजेच परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स (कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकानुसार) नुसार महाराष्ट्राला 2018-19 मध्ये चौथ्या श्रेणीत स्थान मिळाले असून मागील वर्षीपेक्षा महाराष्ट्राच्या गुणांकांत 102अंकांनी वाढ झाली आहे.
- तर 2017-18 साली महाराष्ट्राला पीजीआय इंडेक्समध्ये 700 गुणांसह चौथ्या श्रेणीत स्थान मिळाले होते.
तसेच यंदा चौथ्या श्रेणीत महाराष्ट्रासोबत दिल्लीला ही चौथ्या श्रेणीत स्थान मिळाले असून तिसऱ्या श्रेणीत चंदीगड, गुजरात आणि केरला यांनी येण्याचा मान मिळविला आहे.
दिनविशेष :
- 23 मे 1737 मध्ये पोर्तुगीजांकडून जिकाल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
- सिरील डेमियनला अकॉड्रीयनया या वाघाचे पेटंट 23 मे 1829 मध्ये मिळाले.
- पछिंम जर्मनी हे राष्ट्र 23 मे 1949 मध्ये अस्तित्वात आले.
- आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक 23 मे 1956 रोजी मंजूर झाले.
- बचेन्द्री पाल यांनी 23 मे 1984 रोजी दुपारी 1.09 वाजता (भारतीय प्रमाण वेळ) माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
- जावा प्रोग्रामिंग लँग्वेज ची पहिली आवृत्ती सन 1995 मध्ये 23 मे रोजी प्रकाशीत केली गेली.
Advertisements