Thursday , April 25 2024

20 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

श्रमिक रेल्वें
श्रमिक रेल्वें

चालू घडामोडी (20 मे 2020)

नवी मुंबईला मिळाला 5 स्टार शहराचा दर्जा :

  • केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगचे निकाल मंगळवारी जाहीर केले.
  • तर यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई या एकमेव शहरानं कचरामुक्त शहरांच्या यादीत 5 स्टार रेटिंग पटकावलं आहे.
    नवी मुंबई व्यतिरिक्त छत्तीसगढमधील अंबिकापूर, गुजरातमधील राजकोट आणि सूरत, कर्नाटकमधील म्हैसूर आणि मध्य प्रदेशातील इंदूर या शहरांनीही 5 स्टार रेटिंगचा मान पटकावला आहे.
  • केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली. स्वच्छ भारत अभियानाद्वारे शहरांमध्ये स्टार-रेटिंग अंतर्गत विकसित केलेल्या स्वच्छता निर्देशकांच्या प्रकारांवर शहरांचे रेटिंग आधारित आहे.
  • तसेच यामध्ये कचरा संग्रहण, कचर्‍याचे स्त्रोत वेगळा करणे, कचर्‍यावर वैज्ञानिक प्रक्रिया करणे, भूगर्भशास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम उपक्रमांचे व्यवस्थापन, डंप रेमेडिएशन आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारण प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेत करोना लसीची पहिली मानवी चाचणी यशस्वी :

  • करोना व्हायरसला रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या लसीची अमेरिकेत मानवी चाचणी करण्यात आली आहे.
  • तर अमेरिकेतील ही पहिली मानवी चाचणी आहे. या चाचणीतून समाधानकारक निष्कर्ष समोर आले आहेत.
  • तसेच ज्यांना ही लस टोचण्यात आली, त्यांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसलेले नाहीत तसेच करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढली, असे ही लस विकसित करणाऱ्या मोडर्ना कंपनीने सोमवारी जाहीर केले.
  • पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • मार्चपासून या चाचण्या सुरु झाल्या होत्या. आठ स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले. लस दिल्यानंतर स्वयंसेवकांच्या शरीरात तयार झालेल्या अ‍ॅंटीबॉडीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली.
  • तर मुख्य म्हणजे व्हायरसचा शरीरात होणारा फैलाव रोखण्यामध्ये ही लस अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले. प्रभावी लसीसाठी हीच सर्वात महत्वाची गोष्ट होती.

श्रमिक रेल्वेंसाठी राज्यांच्या परवानगीची अट रद्द :

  • स्थानिक मजुरांना आपापल्या राज्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेंना गंतव्य राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी संबंधित सरकारच्या परवानगीची गरज नसल्याचे मंगळवारी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
  • तर यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नवे आदेशपत्र काढले जाईल.
  • श्रमिक विशेष रेल्वे सोडण्यासाठी गंतव्य राज्यांच्या परवानगीची गरज होती. पण, दोन राज्यांमध्ये पुरेसे सहकार्य दिसत नसल्याने केंद्र सरकारने नवा निर्णय घेतला आहे.
  • तसेच प्रामुख्याने हा प्रश्न पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाल्याने केंद्र सरकारने श्रमिक विशेष रेल्वेंबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
  • झारखंड व छत्तीसगढ ही राज्ये देखील श्रमिक रेल्वेंना मंजुरी देण्यात दिरंगाई करत असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. या सरकारांनी अन्य राज्यांतून येणाऱ्या गाडय़ांना मंजुरी न दिल्याने लाखो स्थलांतरित मजूर खोळंबून राहिले आहेत.
  • 1 मेपासून या श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या असून दररोज विविध राज्यांमध्ये स्थलांतरित मजुरांच्या प्रवासाची सोय केली जात आहे.

तीन महिन्यांसाठी ईपीएफ कपात दहा टक्के :

  • कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) दरमहा दिले जाणारे अंशदान कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • तर येत्या तीन महिन्यांसाठी हा निर्णय लागू राहणार असून, त्याची सूचना कामगार मंत्रालयाने जारी केली आहे.
    देशात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोकड चणचण जाणवत होती.
  • तसेच संघटित क्षेत्रातील 4.3 कोटी कर्मचाऱ्यांना यापासून काहीसा दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीमधील अंशदान सध्याच्या 12 टक्क्यांवरून 10 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तर जुलै महिन्यापर्यंत म्हणजेच येते 3 महिने हा निर्णय लागू राहणार आहे. यामुळे या कर्मचाºयांच्या हाती अधिक रक्कम राहू शकेल व त्यांना भासत असलेली रोकडटंचाई कमी होईल.

दिनविशेष :

  • 20 मे – जागतिक हवामान विज्ञान दिन
  • 1891 मध्ये थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले
  • क्यूबा देश 1902 मध्ये अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
  • चिआंग काई शेक चीन गणराज्यचे 1948 मध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 1850 मध्ये केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला.
  • 1932 मध्ये लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा