Advertisements

चालू घडामोडी (20 जून 2020)
युमीफेनोवीर औषधाची चाचणी करण्याची परवानगी मिळाली:
- भारतीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेला युमीफेनोवीर या औषधाच्या करोना रुग्णांवर चाचण्या करण्याची परवानगी मिळाली आहे.
- तेथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, डॉ. राममनोहर लोहिया इन्स्टिटय़ूट ऑफमेडिकल सायन्सेस, एआरएचे लखनौ मेडिकल कॉलेज या प्रयोगात सहभागी होणार आहेत.
- तसेच हे औषध सुरक्षित मानले जात असून त्याचा वापर विषाणूंना मानवी पेशीत प्रवेश करण्यापासून रोखण्याकरिता होत आहे.
- युमीफेनोवीर हे प्रामुख्याने इन्फ्लुएंझावर वापरले जाते ते चीन व रशियात उपलब्ध आहे.
- तर कोविड 19 रुग्णांवर त्याचा वापर करण्यात आला आहे.
- मे. मेडिझेस्ट फार्मास्युटिकल लि. या गोव्यातील कंपनीला या औषधाचे वितरण करण्याचा परवाना देण्यात आला आहे.
- लखनौतील केंद्रीय औषध संशोधन संस्थेचे संचालक प्रा. तपस कुंड यांनी सांगितलेकी, हे औषध किफातशीर व परिणामकारक असून सुरक्षितही आहे.
दिलगिरीनंतर श्रीकांतची ‘खेलरत्न’साठी शिफारस:
- भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे.
- याउलट अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रणॉयला संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
- मनिला येथे फेब्रुवारीमध्ये झालेल्या आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न खेळता श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे दोघेही बार्सिलोना येथे अन्य स्पर्धा खेळण्यासाठी निघून गेले.
- मात्र प्रणॉय सातत्याने शिस्तभंग करत आहे. आतापर्यंत प्रणॉयच्या वागण्याकडे संघटनेकडून दुर्लक्ष करण्यात आले
मात्र या वेळेस त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे,’’ असे ‘बीएआय’चे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सांगितले.
वानाडोंगरी येथे कोविड केअर सेंटर साकारण्यात आले:

- जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथे कोविड केअर सेंटर साकारण्यात आले आहे.
- या केंद्रात विलगीकरण कक्षासह नमुने तपासणीचे काम प्रारंभ करण्यात आले आहे.
- एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगर परिसरापासून कोरोनाचा प्रारंभ झाला. गजानननगर, पारधी नगर, इसासनीमधील भीमनगर, निलडोहमधील अमरनगर, वानाडोंगरीतील साईराम चौक, राजीवनगर व शिक्षक कॉलनी परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
- विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतला.
- वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले.
- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे व तालुका कोविड केअर समितीचे सचिव उपविभागीय अभियंता जे. के. राव यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने अद्ययावत कोविड केअर सेंटर तयार केले.
- नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले कोविड केअर सेंटर असून, रक्त तपासणी व इतर तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
- ग्रामीण रुग्णालय व रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतून येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे.
दहावीच्या अभ्यासक्रमात होणार हे बदल :
- कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे एनसीईआरटीद्वारे अनेक प्रकरणांचे रूपांतर सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्प स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.
- सीबीएसईद्वारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षांचा तारखा ठरल्या असल्या तरी, त्या घेण्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. मात्र, सीबीएसईने भविष्याचा विचार करीत, अभ्यासक्रमात बरेच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
- विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली होती.
- त्यामुळे या विषयावर आधारित प्रश्न परीक्षेत विचारण्यात येणार नाही. केवळ ज्ञान मिळविण्यासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे.
- यात प्रामुख्याने इतिहासामधील “द एज ऑफ इंडस्ट्रीयलायझेशन, गणितामधील “एरिया ऑफ ट्रॅगल ऍन्ड फ्रुस्टम ऑफ कोन’, विज्ञानामधील “फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍन्ड नॉन मेटल्स आणि टिंडल इफेक्ट यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.
एका दिवसात सर्वाधिक कोरोनाचे 13 हजार 586 नवे रुग्ण:
- देशभरात गेल्या चोवीस तासांमध्ये 13 हजार 586 करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.
- तर त्याआधी दिवसभरात 12 हजार 881 नवे रुग्ण आढळले.
- एकूण करोना रुग्णांची संख्या 3 लाख 80हजार 532झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये 336 मृत्यू झाले असून एकूण मृत्यू 12हजार 573 झाले आहेत.
- गेल्या चोवीस तासांमध्ये 10,386 रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 4 हजार 710 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 53.79 टक्के आहे.
- उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांपेक्षा कमी म्हणजे 1 लाख 63 हजार 248 इतकी आहे.
- देशभरात 960 वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत असून गेल्या चोवीस तासांमध्ये 1 लाख 76 हजार 959 नमुना चाचण्या करण्यात आल्या.
- त्यापैकी 7.67 टक्के नमुने करोनाबाधित आहेत. आत्तापर्यंत 64 लाख 26 हजार 627 नमुना चाचण्या झाल्या आहेत. प्रतिदिन 3 लाख नमुना चाचण्या करण्याची क्षमता आहे.
माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची एनआयपीएफपी अध्यक्षपदी नियुक्ती :
- रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
- नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक फायनॅन्स अँड पॉलिसीच्या (एनआयपीएफपी) अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- यापूर्वी या पदाची जबाबदारी विजय केळकर यांच्या खांद्यावर होती.
- तर केळकर हे 2014 पासून या पदावर कार्यरत होते. दरम्यान, उर्जित पटेल हे 22 जून रोजी एनआयपीएफपीच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहेत.
- एनआयपीएफपीनं यासंदर्भातील माहिती दिली रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हे 22 जून 2020 पासून चार वर्षांसच्या कालावधीसाठी आमच्यासोबत जोडले जात असल्यानं आम्हाला आनंद होत आहे
- तसेच 2018 मध्ये डिसेंबर महिन्यात उर्जित पटेल यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
- असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
दिनविशेष :
- 20 जून हा दिवस जागतिक शरणार्थी दिन म्हणून पाळला जातो.
- इंग्लंडच्या राणीपदी 20 जून 1837 मध्ये व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
- देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस.टी.) हे 20 जून 1887 रोजी सुरू झाले.
- 20 जून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 20 जून 190 मध्ये झाली.
- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ 20 जून 1997 रोजी सुरू झाली.
Advertisements