Advertisements

चालू घडामोडी (19 मे 2020)
कर्नाटकात 31 मेपर्यंत चार राज्यांमधील नागरिकांना प्रवेश नाही :
- महाराष्ट्र, गुजरात, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यातील नागरिकांना कर्नाटकात 31 मेपर्यंत म्हणजेच लॉकडाउनचा चौथा टप्पा संपेपर्यंत प्रवेश मिळणार नाही असं मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी स्पष्ट केलं.
- तर येडियुरप्पा यांनी असंही सांगितलं की, लॉकडाउनच्या नियमांची काटोकोर अमलबजावणी केली जाणार आहे.
- तसेच करोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवांची दुकानं बंद असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच करोना प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं सुरु असतील तर इतर भागांमध्ये काही परवानग्या देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. - लॉकडाउन 4 मध्ये राज्यातल्या बसेस आणि खासगी बसेसना संमती देण्यात आली आहे. या बसेसमध्ये एकावेळी फक्त 30 माणसं असतील. मास्क लावणं आणि डिस्टन्सिंग पाळणं हे महत्त्वाचं असेल. एकाही बसचं तिकिट वाढवलं जाणार नाही.
- ऑटो किंवा टॅक्सी सेवाही सुरु करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. मात्र यांना राज्याच्या सीमा ओलांडता येणार नाहीत. ऑटो किंवा टॅक्सी यामध्ये चालकासह एकूण तिघांनाच बसण्यासाठी संमती देण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं.
- तसंच लॉकडाउन चारच्या कालावाधीत राज्यातील सर्व दुकानं खुली करण्याचा निर्णय झाला आहे.
21 लाख कोटींच्या पॅकेजवर लक्ष ठेवण्यासाठी मोदींनी तयार केली टीम :
- करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅकेज जाहीर केलं.
- तर सलग पाच दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजबद्दल सविस्तर माहिती दिली.
- तसेच त्यानंतर आता मोदी यांनी या पॅकेजची आणि केलेल्या उपाययोजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही, हे पाहण्यासाठी पाच जणांची टीम तयार केली आहे.
- या पॅकेजवर एक अनौपचारिक मंत्रिगट लक्ष ठेवणार आहे. त्याचं नेतृत्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार आहेत. तर या मंत्रिगटात गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियूष गोयल आणि नागरी उड्डयण मंत्री हरदीप पुरी यांचा समावेश आहे.
जर्मन कंपनीची चीनमधून एक्झिट :
- करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक कंपन्या आपला चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.
- तर दोन दिवसांपूर्वी मूळ भारतीय असलेल्या लावा या कंपनीनं चीनमधून आपला व्यवसाय गुंडाळून भारतात येण्याचा निर्णय घेतला होता.
- त्यानंतर आता जर्मनीची बूट तयार करणारी कंपनी वॉन वेल्सनं आपला चीनमधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच लवकरच ही कंपनी भारतात आपला प्रकल्प सुरू करणार आहे.
- वॉन वेल्स ही कंपनी उत्तम आणि दर्जेदार फुटवेअर्स तयार करणारी कंपनी म्हणून परिचित आहे. कंपनीनं नुकताच चीनमधील आपला व्यवहार गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.
- तर याव्यतिरिक्त लवकरच भारतात आपलं उत्पादन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. आग्र्यामध्ये ही कंपनी आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं लॅस्टीक इंटस्ट्रीजसोबत करारही केला आहे.
‘अम्फॉन’चे सुपर चक्रीवादळात रूपांतर :
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे आता सुपर चक्रीवादळात रुपांतर झाले आहे़ त्यातील वाऱ्याचा वेग ताशी 230 किमीपर्यंत वाढला आहे़ दरम्यान, मान्सूनची वाटचाल सुरु असून सोमवारी मान्सूनने निकोबार बेटे व्यापली आहेत़.
- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाचे रुपांतर सोमवारी दुपारी सुपर चक्रीवादळात झाले आहे़ यावेळी त्याचा जोर कमी होऊन तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले असेल़ यावेळी किनारपट्टीवर ताशी 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़.
- दरम्यान, पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़ गेल्या 24 तासात पुणे आणि परभणी येथे पूर्व मोसमी पाऊस झाला. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़
दिनविशेष :
- 19 मे 1743 मध्ये जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रॅड तापमान पातळी विकसित केली.
- हॅले धुमकेतुचे शेपूट 19 मे 1910 मध्ये पृथ्वीला चाटुन गेले.
- पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा 19 मे 1911 मध्ये सुरु झाली.
- 19 मे 1910 मध्ये नथुराम गोडसे यांचा जन्म.
- संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी 19 मे 1297 मध्ये एदलाबाद येथे समाधी घेतली.
Advertisements