Friday , April 19 2024

19 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोबाईल लॅब लाँच केली:
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोबाईल लॅब लाँच केली:

चालू घडामोडी (19 जून 2020)

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोबाईल लॅब लाँच केली:

  • देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत आता सरकार चाचण्यांची संख्याही वाढवण्यावर भर देत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मोबाईल लॅब लाँच केली.
  • या मोबाईल लॅबचा वापर करोनाच्या चाचण्या करण्यासाठी करण्यात येणार आहे.
  • मोबाईल लॅब कोणत्याही ठिकाणी जाऊन करोनाची चाचणी करू शकणार आहे. सर्वत्र जाऊन करोनाची चाचणी करणारी ही देशातील पहिली मोबाईल लॅब आहे.
  • या मोबाईल लॅबमध्ये करोना व्हायरसच्या 25 चाचण्या RT-PCR तंत्रज्ञानाद्वारे, 300 चाचण्या ELISA तंत्रज्ञानाद्वारे करता येणार आहेत.
  • तर या व्यतिरिक्त टिबी आणि एचआयव्हीशी निगडीतही चाचण्या मोबाइल व्हॅनमध्ये करता येणार आहे.
  • ही मोबाईल व्हॅन अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी लॅबची सुविधा नाही अशा ठिकाणी या लॅबचा वापर केला जाईल. याचाच अर्थ गाव-खेड्यांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो.

22 फुटबॉल मैदानांइतकं मोठं कोविड सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे:

  • दिल्ली सरकारने राजधानीत जगातील सर्वात मोठं तात्पुरतं कोविड सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. राधा सोमी अध्यात्मिक केंद्रात हे आरोग्य केंद्र उभारलं जात आहे.
  • या ठिकाणी 10 हजार बेडची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. छत्तरपूर येथे उभारण्यात येत असलेलं कोविड सेंटर 12 लाख 50 हजार स्क्वेअर फूट परिसर व्यापणार आहे.
  • हे सेंटर जवळपास 22 फुटबॉल मैदानांइतकं मोठं असणार आहे.
  • या ठिकाणी पंखे तसंच सीसीटीव्हीची व्यवस्था असणार आहे. या ठिकाणी तीन लाख लोक प्रवचन ऐकण्यासाठी उपस्थित असतात. अशी भव्य असल्यानेच ही जागा कोविड सेंटर उभारण्यासाठी निवडण्यात आलं आहे.
  • याठिकाणी जवळपास 20 मिनी हॉस्पिटल्स असतील आणि प्रत्येक ठिकाणी 500 बेड असतील. 10 टक्के बेड्सना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असेल. या ठिकाणी 400 डॉक्टर्स शिफ्टमध्ये काम करतील”.
  • विशेष बाब म्हणजे या ठिकाणी पुठ्ठ्यांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेले बेड वापरण्यात येणार आहेत. हे बेड सॅनिटाइज करण्याची गरज नाही, पण हवं तर करु शकतो.
  • पुठ्ठ्यावर करोनाचे विषाणू 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही यामुळे ते सॅनिटाइज करण्याची गरज नाही.
    लोखंड, प्लास्टिक आणि लाकडावर करोनाचा विषाणी जवळपास पाच दिवस राहू शकतो.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला:

  • फोननिर्मिती क्षेत्रातील जगभरातील अव्वल कंपन्यांपैकी एक असणाऱ्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने उत्तर प्रदेशमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मूळ दक्षिण कोरियन कंपनी असणाऱ्या सॅमसंगने उत्तर प्रदेशमध्ये 53.67 बिलियन रुपये म्हणजेच 5 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • कंपनीने उत्तर प्रदेशमध्ये स्मार्टफोन डिस्प्ले बनवण्याचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यासंदर्भातील करारांवर 2019 च्या शेवटी सरकार आणि कंपनी दोघांकडूनही स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
  • या कारखान्याच्या माध्यमातून 1300 जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे इनव्हेस्ट इंडिया या मोहिमेअंतर्गत केंद्राने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
  • इनव्हेस्ट इंडिया या मध्यस्थी करणाऱ्या आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचं काम करणाऱ्या खात्याने उत्तर प्रदेश सरकारला पाठवलेल्या सॅमसंगच्या कारखान्यासंदर्भातील पत्राचा रॉयटर्सने हवाला दिला आहे. हा प्रकल्प 2021 पासून सुरु होणार आहे.
  • इन्व्हेस्ट इंडियाच्या पत्रात म्हटले आहे की, “आम्ही उत्तर प्रदेशमधील हायटेक उद्योगांच्या स्थापनेस चालना देण्यासाठी आणि मुख्य गुंतवणूकदार म्हणजेच सॅमसंग डिस्प्लेचे कामकाज भारतात सुरु करण्यासाठी देता येतील अशा सोयींसंदर्भात आमच्या शिफारसी सादर करीत आहोत.
  • 20 वर्षांच्या कालावधीत एकूण गुंतवणूकीवर उच्च भांडवली प्रोत्साहन मिळवून सॅमसंगला फायदा होऊ शकेल असंही इन्व्हेस्ट इंडियाने पत्रात म्हटले आहे.

इटालियन चषक फुटबॉल स्पर्धा नापोलीला विजेतेपद:

  • युव्हेंटसचा अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला अंतिम फेरीत छाप पाडण्याची संधीच मिळाली नाही.
  • गोलशून्य बरोबरीत सुटलेल्या या लढतीत नापोलीने पेनल्टी-शूटआऊटमध्ये 4-2 अशी सरशी साधून सहाव्यांदा इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
  • पेनल्टी-शूटआऊटमध्ये रोनाल्डो पाचव्या क्रमांकावर गोल करण्यासाठी उतरणार होता, पण युव्हेंटसच्या पावलो डायबला आणि डॅनिलो सिल्वा यांचे पहिले दोन गोल अडवल्यानंतर ते पिछाडीवर पडले.
  • तर लिओनाड्रो बोनुक्की आणि आरोन रामसे यांनी गोल केले.
  • मात्र नापोलीच्या चारही जणांनी चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत संघाला विजेतेपद मिळवून दिले. त्यामुळे रोनाल्डोला नापोलीचा जल्लोष लांबूनच पाहावा लागला.
  • नापोलीकडून पेनल्टी-शूटआऊटमध्ये लॉरेंझो इनसाइन, मॅटेओ पॉलिटानो, निकोला मॅक्सीमोव्हिक आणि अर्कादिस्झ मिल्क यांनी गोल केले.

भारतीय हवाई दलाने 33 रशियन लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्ताव सादर केला- केंद्र सरकारकडे:

  • पूर्व लडाखमध्ये झालेल्या चकमकीमुळे भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव सुरु असून यादरम्यान भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारसमोर एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे.
  • हवाई दलाने 33 रशियन लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे.
  • यामध्ये 21 Mig-29 आणि 12 Su-30MKI विमानांचाही समावेश आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
  • तर यासाठी एकूण सहा हजार कोटींचा खर्च येईल असा अंदाज आहे.
  • या प्रस्तावात 12 Su-30MKI विमानांचाही समावेश करण्यात आला आहे.
  • भारत रशियाकडून 21 MiG 29 लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
  • रशियाने भारतीय हवाई दलाला भारताला या विमानात अपेक्षित असणाऱ्या सर्व सुविधा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

दिनविशेष :

  • सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले.
  • 19 जून 1901 हा भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ ‘रामचंद्र बोस’ यांचा जन्मदिन आहे.
  • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 मध्ये महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा