Advertisements

चालू घडामोडी (18 जुलै 2020)
भारतीय रेल्वे ने दिला चीनी कंपनीला 471 कोटींचं कंत्राट रद्द करण्याचा झटका:
- भारतीय कंपन्यांनी चीनसोबत व्यवहार करण्याचं टाळण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता भारतीय रेल्वेनंदेखील चीनला झटका देत चिनी कंपनीला दिलेलं 471 कोटींचं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं.
- कामाचा वेग कमी असल्याचं कारण देत रेल्वेनं चिनी कंपनीला दिलेलं 471 कोटी रूपयांचं कंत्राट रद्द केलं आहे. फ्रेट कॉरिडोअरच्या सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला दिलेला कंत्राट शुक्रवारी रेल्वेने रद्द केलं.
- कानपूर ते मुगलसराय दरम्यानच्या कॉरिडॉरच्या 417 किलोमीटर लांबीच्या मार्गावर हे काम होणार होते.
- ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे (डीएफसीसीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्याची माहिती दिली.
भारतात 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक- विवो स्मार्टफोन निर्माता कंपनी:
- स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसंच कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांची संख्या वाढवून 50 हजार करण्यात येणार आहे. “कंपनीनं भारतात 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
- याद्वारे कंपनीची मोबाईल उत्पादन क्षमता सध्याच्या 3.3 कोटी युनिट्सवरून 12 कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती विवो इंडियाचे संचालक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मारया यांनी दिली.
- भारतातच डिझाईन केलेला आणि भारतातच निर्मिती केलेला विवोचा पहिला फोन 2020-21 च्या दरम्यानच लाँच होणार आहे.
- कंपनीनं आपल्या ग्रेटर नॉयडा येथील प्रकल्पाच्या विस्तारासाठी 7 हजार 500 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली. भारतीय बाजारपेठेत विवोचा हिस्सा तब्बल 21 टक्के आहे आणि ती दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनीही ठरली आहे.
अमेरिकेत 68 हजार 428 करोनाबाधित रुग्णांची नोंद:
- करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासात 68 हजार 428 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
- यासोबत अमेरिकेतील करोनाबाधित रुग्णसंख्या 35 लाख 60 हजार 364 वर पोहोचली आहे.
- तसेच 974 मृत्यूंची नोंद झाली असून मृत रुग्णांची संख्या 1 लाख 38 हजार 201 झाली आहे. एएफपीने ही माहिती दिली आहे.
बीसीसीआय 4800 कोटींचा दंड ठोठावण्यात आला- मुंबई उच्च न्यायालय:
- हैदराबाद स्थित ‘आयपीएल’मधील संघ डेक्कन चार्जर्सविरुद्धचा करार 2012 मध्ये अचानक रद्द केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) 4800 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाच्या लवादाने ‘बीसीसीआय’च्या विरोधात हा निर्णय दिला आहे.
- ‘बीसीसीआय’ने 15 सप्टेंबर 2012मध्ये तातडीने प्रशासकीय समितीची बैठक बोलावत डेक्कन चार्जर्सविरुद्धचा करार मोडीत काढला होता. आर्थिक व्यवहार योग्यपणे न हाताळण्याचे कारण ‘बीसीसीआय’ने दिले होते.
रेयाल माद्रिदला विक्रमी 34वे विजेतेपद- ला लिगा फुटबॉल :
- रेयाल माद्रिदने विक्रमी 34व्यांदा ला-लिगा फुटबॉलचे विजेतेपद पटकावले.
- व्हिलारेयालला 2-1 नमवत एक लढतआधीच माद्रिदने चषक उंचावला.
- माद्रिदचे हे 2017 नंतरचे पहिले ला-लिगा विजेतेपद ठरले. माद्रिदचा हा या स्पर्धेतील सलग 10वा विजय ठरला.
दिनविशेष :
- 18 जुलै हा ‘नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन‘ म्हणून पाळला जातो.
- मुंबई विद्यापीठाची स्थापना 18 जुलै 1857 मध्ये झाला.
- सन 1968 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंटेल (Intel) कंपनीची स्थापना झाली.
- अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 विजेती प्रियांका चोप्रा यांचा जन्म 18 जुलै 1982 रोजी झाला.
- उद्योगपती गोदरेज यांना सन 1996 मध्ये जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
Advertisements