Advertisements

चालू घडामोडी (15 मे 2020)
‘मनरेगा’अंतर्गत 10 हजार कोटी खर्च :
- केंद्र सरकारच्या ‘मनरेगा’ योजनेंतर्गत गेल्या दोन महिन्यात 10 हजार कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी सांगितले.
- स्थलांतरितांना काम उपलब्ध होण्यासाठी ही रक्कम साहाय्यभूत ठरल्याचेही त्या म्हणाल्या. अर्थमंत्र्यांनी गुरुवारी अर्थसाहाय्याचा दुसरा टप्पा जाहीर केला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत कोविड-19 आव्हानावर मात करण्यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केले होते.
- ‘मनरेगा’ अंतर्गत सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी रोजंदारीवर मजूर नियुक्त केले जातात. मात्र सध्याच्या टाळेबंदीच्या कालावधीत या योजनेचा अधिक लाभ स्थलांतरित मजूरांना झाल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला.
- ‘मनरेगा’ अंतर्गत यंदा काम करणाऱ्या एकूण मजूरांपैकी 50 टक्के मजूर हे स्थलांतरित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा :
- प्रवासी मजुरांना पुढील दोन महिन्यांसाठी मोफत धान्य पुरवठा केला जाईल अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
- तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही धान्य मिळणार असंही स्पष्ट करण्यात आलं.
- तसेच प्रति महिना 5 किलो धान्य गरीबांना दिलं जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
- तर याचा फायदा 8 कोटी प्रवासी मजुरांना होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. वन नेशन आणि वन रेशन कार्ड ही योजनाही येत्या काळात आम्ही आणतो आहोत. ज्यामुळे उद्या असं काही संकट आलं तर गरीबाना देशातल्या कोणत्याही रेशन डेपोमधून धान्य उपलब्ध होऊ शकेल असंही स्पष्ट करण्यात आलं.
आता ट्रेन तिकीट बुक करताना IRCTC ला द्यावी लागणार ‘ही’ माहिती :
- भारतीय रेल्वे प्रशासनाने 30 जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकीटं रद्द करण्याची घोषणा केली आहे.
- तर या तिकिटांचे पैसे प्रवाशांना परत करण्यात येत आहेत. या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहतील. गुरुवारी रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
- तसेच यासोबतच आता भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्येही बदल केला आहे.
- लॉकडाउनदरम्यान जर तुम्ही विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला तिकीट बुक करताना अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना ते ज्या ठिकाणी चाललेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे.
- जर भविष्यात गरज पडली तर सहजपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येणे शक्य व्हावे यासाठी ही माहिती आता आयआरसीटीसीला द्यावी लागणार आहे. कालपासून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तिकीट बुक करतेवेळी ही नवीन माहिती विचारण्यास सुरूवात झालीये.
सर्वसामान्य भारतीयांसाठी सैन्याने आखला ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रम :
- भारतीय सैन्याने देशातील युवकांसाठी तीन वर्षांचा इंटर्नशिप कार्यक्रम आणला आहे. यामध्ये अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांचा समावेश आहे.
- युवकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
‘आपल्या देशात बेरोजगारी एक वास्तव आहे’ या सत्याचा स्वीकार करत सैन्याने तीन वर्षाच्या इंटर्नशिप कार्यक्रमाची आखणी केली आहे. - तर ज्या युवकांना सैन्यदलामध्ये कायमस्वरुपी करिअर करायचे नाही. पण सैन्यामधला थरार अनुभवायचा आहे. त्यांच्यासाठी तीन वर्षांसाठी ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
- इंटर्नशिप कार्यक्रमातंर्गत सैन्य दलात प्रवेशाच्या निकषामध्ये कुठलीही सवलत मिळणार नाही. ‘या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे’ अशी माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.
- तसेच हा प्रस्ताव स्वीकारला तरी ‘टूर ऑफ ड्युटी’ प्रत्येकासाठी बंधनकारक असणार नाही. तीन वर्षांच्या इंटर्नशिपसाठी सैन्य दलात रुजू झाल्यानंतर मिळणारे वेतन करमुक्त असू शकते तसेच पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये प्राधान्य सुद्धा मिळू शकते.
वकील दिसणार पांढऱ्या शुभ्र कपड्यात :
- कोविड-19 आजारानं आपल्याला अनेक गोष्टी बदलण्यास भाग पाडलं आहे. सुप्रीम कोर्टही यातून सुटलेलं नाही. कारण, या आजाराच्या पार्श्वभूमीवर वकिलांना (Virtual Court System) आभासी सुनावणीदरम्यान अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
- तर त्यामुळं सुप्रीम कोर्टासमोर युक्तीवाद करणारे वकील केवळ पाढरा शर्ट आणि नेक टाय वापरु शकतील, त्यावर काळा कोट घालण्याची गरज नाही.
- करोनाविषाणूचा फैलाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून सुप्रीम कोर्टानं तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय बुधवारी जाहीर केला.
दिनविशेष :
- 15 मे : भारतीय वृक्ष दिन.
- 15 मे : जागतिक कुटुंब दिन.
- जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी 15 मे 1718 मध्ये घेतले.
- रॉबर्ट वॉल्पोल 15 मे 1730 मध्ये युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
- 15 मे 1811 मध्ये पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
- सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या बेलीज बीड्सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी 15 मे 1836 मध्ये सर्वप्रथम निरीक्षण केले.
- मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात 15 मे 1935 मध्ये झाली.
- 15 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
Advertisements