Advertisements

चालू घडामोडी (13 जून 2020)
आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भारतीयांना मोठया प्रमाणात फटका बसू शकतो:
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प H-1B सह रोजगार देणारे काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत. याचा भारतीयांना मोठया प्रमाणात फटका बसू शकतो.
- आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भारतीय तरुण-तरुणींकडून मोठया प्रमाणात H-1B व्हिसासाठी अर्ज केला जातो.
- अमेरिकेतील स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प H-1B सह काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत.
- एक ऑक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ट्रम्प प्रशासनाकडून ही स्थगिती लागू केली जाऊ शकते. कारण याच काळात नवीन व्हिसा जारी केले जातात.
- अमेरिकेत आर्थिक वर्ष ऑक्टोंबरपासून सुरु होते.
- अमेरिकन टेक्नोलॉजी कंपन्या दरवर्षी H-1B व्हिसाच्या आधारे हजारो भारतीय आणि चिनी तरुणांना नोकऱ्या देतात.
करोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला भारत:
- गेल्या २४ तासांमधील करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
- वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारतात करोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे.
- सध्या भारतातील करोनाबाधितांची संख्या दोन लाख 98 हजार 205 इतकी झाली आहे.
- गेल्या आठवड्यात स्पेनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानावर पोहचला होता.
- अमेरिकेत आतापर्यंत 20 लाख 89 हजार 701 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
- दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये 8 लाखांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रशियामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.
आयसीसीने केला काही नियमांमध्ये बदल:
- क्रिकेटचे सामने सुरु करण्यासाठीही आयसीसीने काही नियमांमध्ये बदल केला आहे.
- ज्यात गोलंदाजांना चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर न करणं, स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य, बदली खेळाडू, DRS च्या संख्येत असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत.
- याचसोबत ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येत असलेल्या बिग बॅश लिग स्पर्धेच्या आयोजकांनीही नियमांमध्ये बदल केला आहे.
- यामधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे बिग बॅश लिगमध्ये आता वाईड बॉलवरही फ्री हीट दिली जाणार आहे.
- याआधी आयसीसीच्या नियमानुसार फक्त नो-बॉलवर फलंदाजाला फ्री-हीट मिळायची.
- याव्यतिरीक्त पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला बोनस गूण, परिस्थितीनुसार 10 षटकानंतर पर्यायी खेळाडूला मैदानात उतरवणं असे काही नवीन नियम बिग बॅश लिगमध्ये लागू करण्यात येणार आहेत.
दिनविशेष :
- प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म 13 जून 1831 मध्ये झाला होता.
- कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म 13 जून 1879 मध्ये झाला.
- सन 1983 मध्ये पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
Advertisements