Wednesday , April 24 2024

10 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन
चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2020)
भारतीय वंशाचे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन:
भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दातार भारतीय वंशाच्याच असलेल्या नितीन नोहरीयाची जागा घेतील. “आर्थर लोव्हस डिकिन्सन बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्राध्यापक आणि हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) येथील विद्यापीठातील वरिष्ठ सहकारी डीन श्रीकांत दातार हे हॉवर्ड बिझनेस स्कूलचे पुढील डीन असतील, अशी माहिती अध्यक्ष लॅरी बाको यांनी दिली.
1 जानेवारी 2021 पासून दातार या पदी रुजू होतील.
हॉवर्ड बिझनेस स्तूलमध्ये गेली 25 वर्षे त्यांनी अनेक पदांवर आपली सेवा बजावली असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

10 कोटी पोटांची भूक भागविणाऱ्या या अभियानाचे योगदानाला नोबेल पुरस्कार:
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न अभियानास (डब्ल्यूएफपी) शुक्रवारी 2020 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
जगातील भूक आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न हाताळण्यात या संस्थेने मोलाची भूमिका पार पाडली असून 10 कोटी पोटांची भूक भागविणाऱ्या या अभियानाचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण ठरल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.
नोबेल समितीचे प्रमुख बेरीट रिस अँडरसन यांनी म्हटले आहे,की या पुरस्काराने जगाचे लक्ष प्रथमच जगातील भुकेच्या समस्येकडे वेधले गेले.
11 लाख डॉलरचा हा पुरस्कार असून त्यात सुवर्णपदकाचाही समावेश आहे.
डब्ल्यूएफपीचे प्रमुख डेव्हिड बीसली यांनी सांगितले, की या पुरस्काराने एकाचवेळी धक्काही बसला व आश्चर्यही वाटले.
रुद्रम-1 ची चाचणी यशस्वी झाली:
डिफेन्स रीसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेण्ट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) हवाई दलासाठी विकसित केलेल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या रुद्रम-1 या रेडिओलहरीवेधी क्षेपणास्त्राची शुक्रवारी सुखोई-30द्वारे ओदिशातील बालासोर तळावरून यशस्वी चाचणी केली.
रुद्रम-1 हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचीवर डागले जाऊ शकते, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे संकेत अथवा लहरी पकडण्यासाठीही हे क्षेपणास्त्र तत्पर आहे.
या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरता येऊ शकते.
रुद्रम-1ची चाचणी यशस्वी झाली असली तरी त्यामध्ये काही बदल अपेक्षित असल्याने त्याची शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : नदाल अंतिम फेरीत:
स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने विक्रमी 13व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
लाल मातीचा बादशाह समजल्या जाणाऱ्या नदालने उपांत्य फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनवर विजय मिळवला.
नदालने अंतिम फेरी गाठत रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याच्या दिशेने कूच केली.
नदालने श्वार्ट्झमनला 6-3, 6-3, 7-3 असे नमवत १३व्या फ्रेंच ग्रँडस्लॅम जेतेपदापासून तो एक विजय दूर आहे.
नदालने यंदाच्या स्पर्धेत एकही सेट न गमावण्याची कामगिरी उपांत्य फेरीतही कायम राखली.
दिनविशेष:
10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन‘ तसेच ‘जागतिक लापशी दिन‘ आहे.
सन 1846 मध्ये इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 मध्ये झाला.
श्यामची आई चित्रपटाला 1954 या साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
सन 1998 मध्ये ‘आदर्श सेन आनंद‘ भारताचे 29वे सरन्यायाधीश बनले होते.

Mahesh Gaikwad is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master’s degree and looking to expand her skills here at Majhi Naukri.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा