Saturday , April 20 2024

1 June 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

विनेश फोगट
विनेश फोगट

चालू घडामोडी (1 जून 2020)

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर :

  • करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या 10 देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे 1 लाख 90 हजार 609 रुग्ण आहेत.
  • तर यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये करोनाचे 1 लाख 88 हजार 882 रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
  • तसेच पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत करोनाचे 18 लाख रुग्ण आहेत.
  • यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये करोनाचे पाच लाख तर रशियात करोनाचे चार लाख रुग्ण आहेत.
  • पहिल्या क्रमांकावर ब्राझिल असून त्यानंतर अनुक्रमे ब्राझिल, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली आणि त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.

स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र आयोगाचा विचार :

  • स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिली.
  • करोनामुळे लाखो स्थलांतरितांना विविध प्रकारच्या हालअपेष्टा, आव्हानांना सामोरे जावे लागले. त्याची दखल घेताना मोदींनी स्थलांतरितांसाठी आयोग नेमण्यासंदर्भात केंद्रीय स्तरावर सविस्तर चर्चा केली जात असल्याचे सांगितले.
  • तर मजुरांकडे कोणत्या प्रकारचे कौशल्ये आहेत, याची माहिती घेण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी काही नवउद्यमी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर स्थलांतरित मजुरांसाठी आयोग नियुक्त करण्याचा विचार केला जात आहे, असे मोदी म्हणाले.
  • करोनामुळे शहरांतील रोजगारावर गदा आल्याने स्थलांतरित मजूर गावी निघून गेले आहेत. तिथे त्यांना रोजगाराची तसेच, स्वयंरोजगाराची संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गावांमध्ये लघुउद्योग सुरू करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात असल्याचे मोदी सांगितले.

खेलरत्न पुरस्कारासाठी विनेश फोगटची शिफारस :

  • जागतिक कुस्ती स्पर्धेतील कांस्यपदक विजेती विनेश फोगटची खेलरत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारासाठी सलग दुसऱ्या वर्षी शिफारस करण्यात आली आहे.
  • तर रियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे.
  • टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेली विनेश ही सध्या भारताकडून एकमेव महिला कुस्तीपटू आहे. गेल्या वर्षीदेखील खेलरत्नसाठी तिची शिफारस झाली होती. मात्र कुस्तीपटू बजरंग पूनियाला हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. गेल्या तीन वर्षांत विनेशची सातत्यपूर्ण कामगिरी झाली आहे.
  • तसेच जकार्ता येथे आशिया क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, 2019 मध्ये नूर सुलतान येथे जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक, या वर्षांच्या सुरुवातीला नवी दिल्ली येथे आशिया कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक अशी कामगिरी विनेशने केली आहे.
  • साक्षी मलिकला 2016 मध्ये खेलरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. मात्र तरीदेखील तिने अर्जुन पुरस्कारासाठी निवड व्हावी असा अर्ज पाठवला आहे.

आजपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’:

  • देशभरात आजपासून म्हणजेच 1 जूनपासून ‘वन नेशन वन रेशन कार्ड‘ ही योजना लागू होणार आहे.
  • तर या योजनेमुळे रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातून सरकारने ठरवलेल्या दरात अन्नधान्य विकत घेऊ शकणार आहेत.
  • तसेच आतापर्यंत रेशन कार्ड धारक ज्या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड तयार करत त्याच जिल्ह्यात त्यांना रेशन घेता येत होते. परंतु, आता आता सर्व लाभार्थ्यांना देशभरातील कोणत्याही ठिकाणावरुन रेशन घेता येणार आहे.
  • सुप्रीम कोर्टाने देशात अशा प्रकारची योजना लागू व्हावी यासाठी केंद्र सरकारला आदेश दिले होते. अखेर ही योजना 1 जून पासून संपूर्ण देशभरात लागू होत आहे.
  • वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.
  • तर यासाठी ओडिसा, मिझोरम आणि नागालँड ही 3 राज्ये देखील तयार होत आहेत. एकूण 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेच्या शुभारंभासाठी सज्ज असणार आहेत.
  • ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत पीडीएस मशीनद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. पीडीएस मशीनच्या आधारे लाभार्थ्यांना ओळखले जाईल. या योजनेसाठी सरकारला सर्व रेशन दुकानांवर पीडीएस मशीन बसवावी लागेल.
  • तसेच या योजनेसाठी नवे रेशनकार्ड बनवायची किंवा जुनं रेशन कार्ड जमा करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी आपल्या जुन्या रेशन कार्डमार्फतही योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • रेशन कार्ड दोन भाषांमध्ये राहतील. पहिली म्हणजे स्थानिक भाषा आणि दुसरी भाषा ही हिंदी किंवा इंग्रजी असेल.
    या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दर महिन्याला 3 रुपये किलोने तांदूळ तर 2 रुपये किलोने गहू मिळतील. दरम्यान, ज्या लोकांकडे रेशन कार्ड नाही, ते ऑनलाईन अर्ज दाखल करुन रेशन कार्ड मिळवू शकतात.

दिनविशेष :

  • 1 जून – जागतिक दुध दिन
  • पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1 जून 1842 रोजी झाला.
  • फिंगरप्रिंटिंगचे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म 1 जून 1843 मध्ये झाला.
  • विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे 1 जून 1929 मध्ये स्थापना केली.
  • मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी 1 जून 1930 रोजी सुरू झाली.
  • 1 जून 1945 रोजी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.

Check Also

Bhiwapur Nagar Panchayat Bharti City Coordinator job

नगर पंचायत भिवापूर – नागपूर भरती २०२२

Nagar Panchayat Bhiwapur – Nagpur Recruitment 2022 Bhiwapur Nagar Panchayat Bharti 2022: Nagar Panchayat Bhiwapur …

जाहिराती
फॉलो व्हाट्सअँप चॅनेल
फॉलो इन्स्टाग्राम
नोकरी शोधा