चालू घडामोडी : ३१ जानेवारी २०२१ | Mission MPSC

Advertisements

AdvertisementsCurrent Affairs : 31 January 2021महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी भारतातमहिलांची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा पुढील वर्षी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान भारतात रंगणार असल्याची माहिती आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) दिली.गेल्या वर्षी ही स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवण्यात आली होती.यंदा त्यात १२ संघांचा समावेश करण्यात आला आहे.या स्पर्धेद्वारे आशियातील पाच संघांना २०२३च्या ‘फिफा’ महिला विश्वचषक स्पर्धेत थेट पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे.पुढील वर्षी देशाचा विकास दर विक्रमी ११ टक्क्यांवर जाणारयंदाच्या वर्षी देशाच्या जीडीपीत ७.७ टक्क्यांची घसरण होईल. मात्र पुढील वर्षी आर्थिक वृद्धिदर ११ टक्क्यांच्या पातळीवर पोहाेचेल.शुक्रवारी संसदेत सादर वित्त वर्ष २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात सरकारने हे अंदाज व्यक्त केले आहेत.महामारीमुळे २०२०-२१ वर्षातील अंदािजत ७.७% संकुचनामुळे भारताचे प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पादन २०२१-२२ मध्ये ११.०% व सध्याच्या बाजार मूल्याने जीडीपी १५.४% दराने वाढण्याचा अंदाज आहे.आरोग्यावर जीडीपीच्या ३%खर्च करण्याची शिफारसया अहवालात आरोग्यावर सरकारी खर्च सध्याच्या जीडीपीच्या एका टक्क्यावरून २.५ ते ३% करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे लोकांचा आरोग्यावरील खर्च सध्याच्या ६५ टक्क्यांवरून ३५% होईल.यंदा प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये ७,२५८ रुपयांची झाली घटप्रकार 2019-20 2020-21जीडीपी 203.4 194.8 (वर्तमान मूल्य) लाख कोटी रु. लाख कोटी रु.दरडोई उत्पन्न 134226 126968विकास दर 4.2% -7.7%महसुली तूट 4.6% 3.5%विकास दर अंदाज 7.7 % 11%आयएमएफ 8.0 % 11.5%आरबीआय 7.5% —कृषी क्षेत्रामध्ये सकारात्मक वाढकेंद्राच्या आर्थिक सर्व्हे अहवालानुसार, कृषी या एकमेव क्षेत्रात सकारात्मक वृद्धी झाली. कृषीचा विकास दर यंदा ३.४% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रांत ९.६% व ८.८% घटीचा अंदाज आहे.भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारत 86 व्या स्थानीसार्वजिनक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार जारी करण्यात आलेल्या २०२० च्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकानुसार (सीपीआय) भारत सहा पायऱ्यांनी खाली घसरत १८० देशांत ८६ व्या स्थानावर आला आहे.ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक जारी करण्यात आला.शून्य ते शंभर गुणांवरून १८० देशांतील सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रमाणानुसार १८० देशांची क्रमवारी जारी केली जाते.भारत ४० अंकांनी १८० देशांत ८६ स्थानी आहे. २०१९ मध्ये भारत १८० देशांत ८० व्या क्रमांकावर होता.२०१९ आणि २०२० मध्ये भारताचे भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात (सीपीआय) गुण समान आहेत.सीपीआय २०२० च्या अहवालानुसार भारत अजूनही भ्रष्टाचार निर्देशांकात खूप मागे आहे.यावर्षी न्यूझीलँड आणि डेन्मार्क ८८ अंकांनी पहिल्या स्थानी आहे.सोमालिया आणि दक्षिण सुदान १२ अंकांनी १७९ व्या क्रमांकावर आहे.

Advertisements
👇 आपल्या मित्रांना शेअर करा 👇

Join WhatsApp Group